शंकर पाटिल की जन्मशताब्दी: मंडलिक कॉलेज में भित्तिपत्रक का हुआ उद्घाटन
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय में मराठी कथाकार शंकर पाटिल की जन्मशताब्दी पर 'ग्रामीण कथाकार शंकर पाटिल' भित्तिपत्रक का अनावरण किया गया।
तस्वीर में सदाशिवराव मंडलिक कॉलेज परिसर में भित्तिपत्रक उद्घाटन के दौरान उपस्थित प्रोफेसर और छात्र दिख रहे हैं।
मराठी ग्रामीण कथेला स्वतंत्र ओळख आणि वेगळी उंची मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील हे मराठी ग्रामीण कथाविश्वातील दीपस्तंभ होते, असे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ग्रामीण कथाकार शंकर पाटील’ या भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. होडगे बोलत होते.
डॉ. होडगे म्हणाले, शंकर पाटील यांनी गावगाड्यातील मानवी मनाचे अनोखे दर्शन आपल्या साहित्याच्या माध्यमातून घडविले. त्यांच्या लेखनातून कोल्हापूरच्या प्रादेशिक बोलीचे विविध नमुने प्रभावीपणे पाहायला मिळतात. ग्रामीण जीवनातील पात्रांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विनोदी प्रसंग उभे केले; त्याचबरोबर ग्रामीण माणसाच्या व्यथा आणि वेदनाही तितक्याच ताकदीने मराठी साहित्यात मांडल्या.
शंकर पाटील यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीतून मराठी कथेला नवी दिशा दिली. ग्रामीण जीवनाचे वास्तव, तेथील माणसांचे भावविश्व आणि सामाजिक परिस्थिती यांचे प्रभावी चित्रण त्यांच्या साहित्यात आढळते. त्यामुळे मराठी कथाविश्वातील त्यांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या साहित्याची लोकप्रियता आजही कायम आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास लेखक व चित्रकार संदीप मुसळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. सुखदेव एकल यांनी केले, तर आभार प्रा. नूतन बीरंबोळे यांनी मानले.
यावेळी न्याक समन्वयक प्रा. माणिक पाटील, स्टाफ सेक्रेटरी प्रा. दादासाहेब सरदेसाई, प्रा. दीपक साळुंखे, प्रा. संजय हेरवाडे, प्रा. अशोक पाटील, प्रा. सुशांत पाटील, प्रा. राम पाटील, प्रा. स्वप्निल मेंडके, प्रा. नितेश रायकर, प्रा. धनाजी खतकर, प्रा. दिपाली सामंत, प्रा. मनीषा पाटील यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘ग्रामीण कथाकार शंकर पाटील’ या भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे, लेखक-चित्रकार संदीप मुसळे व मान्यवर उपस्थित होते.