कोल्हापूर : विजय मोरबाळे

योग्य आर्थिक नियोजन, नियमित गुंतवणूक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते, असे प्रतिपादन एनजे इंडिया-कोल्हापूरचे शाखा व्यवस्थापक अजिंक्य गुरव यांनी केले.

श्री मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे कला, विज्ञान, वाणिज्य व शिक्षण महाविद्यालय, गारगोटी येथे IQAC, कर्मवीर प्रबोधिनी आणि रसायनशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘म्युच्युअल फंड : SIP व SWP’ या विषयावर गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अजिंक्य गुरव आणि डॉ. प्रदीप पाटील यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.

अजिंक्य गुरव आणि डॉ. प्रदीप पाटील यांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे महत्त्व, SIP (Systematic Investment Plan), SWP (Systematic Withdrawal Plan), गुंतवणुकीचे नियोजन, जोखीम व्यवस्थापन तसेच दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी बचत आणि गुंतवणूक यातील फरक, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची प्रक्रिया, SIPच्या माध्यमातून नियमित गुंतवणूक आणि SWPद्वारे नियोजित पद्धतीने रक्कम काढण्याची पद्धत याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. देसाई होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. (डॉ.) एस. एम. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. IQAC समन्वयक डॉ. एस. ए. व्हनाळकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. (डॉ.) यू. बी. चौगले यांनी आभार मानले.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे नियोजन, SIP आणि SWPची कार्यपद्धती, जोखीम व्यवस्थापन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांबाबत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मिळालेले मार्गदर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

Tags: