कोगील बुद्रुक में लांपी/खुरपका-मुंहपका रोग से बचाव के लिए पशु टीकाकरण अभियान
सेवा संकल्प अभियान के तहत पशुपालकों को दी गई संक्रामक रोगों की जानकारी, डॉक्टरों की देखरेख में हुआ मवेशियों का टीकाकरण।
तस्वीर में कोगील बुद्रुक में सेवा संकल्प अभियान का बैनर पकड़े अधिकारी, प्राध्यापक और छात्राएं दिख रहे हैं।
सेवा संकल्प अभियानांतर्गत कोगील बुद्रुक येथे लाळ्या-खुरकूत (Foot and Mouth Disease) रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात आले. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एम. एम. यादव यांनी गावाला भेट देऊन पशुपालकांच्या जनावरांचे लसीकरण केले.
लाळ्या-खुरकूत हा जनावरांमध्ये आढळणारा संसर्गजन्य रोग असून, त्याचा प्रादुर्भाव झाल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले.
लसीकरणादरम्यान डॉ. यादव यांनी पशुपालकांशी संवाद साधून जनावरांच्या आरोग्याची पाहणी केली. तसेच रोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित लसीकरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. डॉ. यादव यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जनावरांची स्वच्छता राखणे, योग्य आहार देणे, आजारी जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवणे आणि आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले.
या उपक्रमासाठी RAWE समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली RAWEच्या कृषिकन्यांनी लसीकरण उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. पूजा नाळे, माने ऋषिका, गौरी खाटपे, प्रांजल मांजरे, प्राजक्ता पाटील आणि संध्या पेटकर या कृषिकन्यांनी पशुपालकांशी संवाद साधून लसीकरणाबाबत जनजागृती केली.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून गावातील पशुपालकांपर्यंत पशुसंवर्धनविषयक तांत्रिक माहिती पोहोचविणे, पशुरोगांपासून जनावरांचे संरक्षण करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाला पशुपालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
कोगील बुद्रुक येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत जनावरांचे लसीकरण करताना डॉ. एम. एम. यादव. यावेळी RAWE समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे व कृषिकन्या उपस्थित होत्या.