तस्वीर में स्कूल के मैदान पर छात्र नुक्कड़ नाटक प्रस्तुत करते दिख रहे हैं।

गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या शालेय आंतरवासिता टप्पा दोन अंतर्गत श्रीराम हायस्कूल, गंगापूर येथे छात्र प्रशिक्षणार्थींनी ‘ओझोन वाचवा, पृथ्वी वाचवा’ या विषयावर पथनाट्य सादर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

शाळेच्या प्रशस्त मैदानावर सादर झालेल्या या पथनाट्यात ओझोन थराचे महत्त्व, वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, वृक्षतोड तसेच मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली. प्रभावी संवाद, घोषवाक्ये आणि अभिनयाच्या माध्यमातून छात्र प्रशिक्षणार्थींनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश उपस्थितांच्या मनावर ठसविला.

या पथनाट्याला प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याचा संदेश आत्मसात केला.

या उपक्रमासाठी गट मार्गदर्शक प्रा. डॉ. आर. के. शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. छात्र मुख्याध्यापिका शरयू वास्कर व छात्र उपमुख्याध्यापक ऋषिकेश माळी यांच्या नियोजन व सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

‘ओझोनचे संरक्षण म्हणजे पृथ्वीचे संरक्षण आणि पृथ्वीचे संरक्षण म्हणजे आपल्या भविष्याचे संरक्षण’ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पथनाट्याचा समारोप करण्यात आला. गंगापूर येथील श्रीराम हायस्कूलमध्ये छात्र प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या या पथनाट्यातून ओझोन संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

Tags: