शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी ऑगस्टच्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी ऑगस्टच्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. शिरपूर व त-हाडी परिसरातील पात्र शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करून त्रुटी असल्यास grievance नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त-हाडी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत शिरपूर तालुक्यातील व त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याचे सहकार आयुक्त यांनी LIVE चर्चेत पहिल्या यादीतील KYC, खाते क्रमांक, Farmer ID व इतर त्रुटींची पडताळणी सुरू असून दुसरी यादी ऑगस्टच्या मध्यापर्यंत प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
शिरपूर तालुक्यातील व त-हाडी परिसरातील पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात Aadhaar Biometric e-KYC’ पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहितीमध्ये त्रुटी असल्यास grievance नोंदवावी. यादीत नाव नसल्यास तहसीलदार किंवा DDR कार्यालयाशी संपर्क साधावा.
योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२६ पर्यंतची पात्र थकबाकी ग्राह्य धरली जाणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या पात्र पीक कर्जासाठी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी बँकेत वारस नोंद करून Aadhaar व खाते अद्ययावत करावे, असेही सांगण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील व त-हाडी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवून आवश्यक कागदपत्रे व KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विशाल कंरके, माजी व्हा चेअरमन पिंक संरक्षण सहकारी संस्था त-हाडी यांनी केले आहे.
दुसरी यादी ऑगस्टच्या मध्यापर्यंत प्रसिद्ध करण्याच्या प्रयत्नामुळे पात्र शेतकऱ्यांनी KYC, बँक खाते, Farmer ID आणि संबंधित माहितीतील त्रुटी वेळेत दुरुस्त करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.