समुद्रपुर कार्यालय में लैपटॉप के पास खड़े होकर अधिकारियों से बात करते विकास खड़गे।

समुद्रपुर : महसूल कार्यालयात येणारा सर्वसामान्य नागरिक आपले काम झाल्याचे समाधान घेऊन घरी गेला पाहिजे, तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाची वागणूक देत आत्मीयतेने संवाद साधावा, असे निर्देश राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी दिले.

समुद्रपुर येथील तहसील कार्यालय आणि सह दुय्यम निबंधक कार्यालयाला भेट देऊन पाहणी करताना विकास खारगे यांनी महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महसूल विभाग गेल्या काही वर्षांत अधिक लोकाभिमुख आणि गतिमान झाला आहे. बदलत्या काळात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या भूमिका समजून घेत लोककल्याणासाठी काम केले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

विकास खारगे यांनी समुद्रपुर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देऊन मुद्रांक नोंदणीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, संपर्क अधिकारी विश्वास सिरसाठ, तहसीलदार कपिल हाटकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगताप, सह जिल्हा निबंधक के.एस. कांबळे तसेच महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यानंतर त्यांनी समुद्रपुर तहसील कार्यालयाला भेट देऊन तलाठी आस्थापना आणि संजय गांधी निराधार अनुदान विभागाची माहिती जाणून घेतली. संजय गांधी योजनेच्या एका महिला लाभार्थ्यांशी थेट मोबाईलवर संपर्क साधून त्यांना योजनेचा नियमित लाभ मिळतो की नाही, याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

महसूल कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला समाधान मिळाले पाहिजे, यावर खारगे यांनी यावेळी विशेष भर दिला. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकास सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधण्याचे निर्देश त्यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. नागरिकाभिमुख आणि गतिमान महसूल प्रशासनाच्या दृष्टीने कार्यालयीन व्यवहारात संवेदनशीलता व सन्मानाची वागणूक ठेवण्याचा संदेश या पाहणीदरम्यान देण्यात आला.

Tags: