केंद्रस्तरीय शिक्षण परिषद में शैक्षणिक गुणवत्ता और निपुण अभियान पर मंथन
जि.प. केंद्रशाळा अर्थे खुर्द येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात पार पडली। सेवापूर्ती सत्कारासह निपुण GR, विद्यार्थी प्रगती, शैक्षणिक गुणवत्ता आणि विविध शालेय उपक्रमांवर मार्गदर्शन करण्यात आले।
तस्वीर में अर्थे खुर्द केंद्रशाला में आयोजित शिक्षण परिषद के दौरान शिक्षकों और गणमान्य व्यक्तियों द्वारा एक अतिथि का स्वागत और सम्मान किया जा रहा है।
जि.प. केंद्रशाला अर्थे खुर्द में केंद्रस्तरीय शिक्षण परिषद का आयोजन उत्साहपूर्ण वातावरण में किया गया। शिक्षण परिषद के दूसरे सत्र का आयोजन गटशिक्षणाधिकारी मा. विठ्ठलजी घुगे साहेब तथा शालेय पोषण आहार अधीक्षक मा. एकनाथजी आव्हाड साहेब के मार्गदर्शन में हुआ। परिषद में शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी प्रगति, निपुण अभियान सहित स्कूलों से जुड़े विभिन्न विषयों पर सविस्तर चर्चा की गई।
पहले सत्र में सेवानिवृत्त अर्थे केंद्र के माजी केंद्रप्रमुख कैलास सूर्यवंशी, बलकुवे शाला के माजी मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, अर्थे केंद्राचे केंद्रप्रमुख उमाकांत गुरव, अर्थे केंद्रशाळेचे पदो. मुख्याध्यापक किशोर पाटील, अर्थे केंद्रातील सर्व जि.प. शाळांचे मुख्याध्यापक व सहकारी तसेच माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व सहकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उमाकांत गुरव यांनी भूषविले।
अर्थे शाळेतील मुलींनी ईश्वस्तवन व स्वागतगीत सादर केले। यावेळी अर्थे येथील माजी केंद्रप्रमुख कैलास सूर्यवंशी व माजी मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार अर्थे केंद्राचे केंद्रप्रमुख उमाकांत गुरव तसेच केंद्रातील मुख्याध्यापक व सहकारी बंधू-भगिनींनी केला।
मान्यवरांच्या सत्कारानंतर डॉ. भुपेंद्र राजपूत सर यांनी दोन्ही सत्कारमूर्तींच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले। भरवाडे शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब मेटकर यांनीही त्यांच्या कामाचा आणि स्वभावाचा उल्लेख करून जुन्या आठवणींना उजाळा दिला। दिगंबर वाघ यांनीदेखील मनोगत व्यक्त केले।
सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना कैलास सूर्यवंशी यांनी केंद्रातील सर्व शिक्षक कार्यतत्पर व शिस्तप्रिय असल्याचे सांगितले। रामचंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतातून केंद्रातील शिक्षक प्रेमळ व सहकार्यशील असल्याचे सांगून सर्वांची खूप आठवण येते, असे सांगितले।
दुसऱ्या सत्रात विशेष शिक्षक दलपत गिरासे यांनी ‘निपुण GR वाचन’ ही तासिका घेतली। विद्यार्थी प्रगतिसाठी उपक्रम सादरीकरण ही तासिका संजय तमखाने यांनी घेतली। अध्ययन निष्पत्ती मासिक नियोजन ही तासिका तृप्ती यांनी घेतली, तर SMC नवीन मार्गदर्शक सूचना ही तासिका शेवाळे यांनी घेतली।
शेवटच्या तासिकेत स्थानिक व प्रशासकीय बाबी, शाळेत करावयाचे विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता तसेच परिपत्रकांबाबत केंद्रप्रमुख उमाकांत गुरव यांनी सविस्तर सूचना दिल्या।
यावेळी 4 थी व 5 वी स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल उर्दू शाळा वाघाडी येथील विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला। तसेच केंद्रशाळा अर्थे येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट रांगोळी रेखाटन केल्याबद्दल त्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला।
अतिशय उत्साहात शिक्षण परिषद संपन्न झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भटू शेवाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगिता नेरकर यांनी केले। सु. ल. पाटील, अर्चना तमखाने, निता शिंदे आणि निता चिंचोले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले।