वर्धा: स्वास्थ्य सेविका ने क्वार्टर में लगाई फांसी, पति पर केस दर्ज
पति की शराब की लत और लगातार मारपीट से परेशान महिला ने उठाया आत्मघाती कदम, बहन की शिकायत पर समुद्रपुर पुलिस ने मामला दर्ज किया।

तस्वीर में स्वास्थ्य केंद्र परिसर में चश्मा पहने स्वास्थ्य सेविका सरीता परचाके खुरसंगे दिख रही हैं।
समुद्रपूर तालुक्यातील उब्दा येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविकेने आरोग्य विभागाच्या क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 7 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. मृतक सरीता परचाके खुरसंगे यांनी पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार त्यांची मोठी बहीण कल्पना मडावी यांनी समुद्रपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी पती आशिष खुरसंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी उब्दा येथील आरोग्य विभागाच्या क्वार्टरमध्ये आरोग्य सेविका सरीता परचाके खुरसंगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. सेलू मुरपाड येथील रहिवासी असलेल्या त्यांच्या बहीण कल्पना मडावी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मृतक सरीता परचाके खुरसंगे यांचा विवाह सन 2015 मध्ये सातेफळ येथे वर्धा येथील आशिष खुरसंगे यांच्यासोबत समाजरीतीरिवाजानुसार झाला होता.
विवाहानंतर सरीता यांना मोठी मुलगी कु. काव्या, वय 10 वर्षे आणि लहान मुलगा स्वरूप, वय 2 वर्षे अशी दोन मुले आहेत. सरीता परचाके खुरसंगे उब्दा येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. मागील दोन वर्षांपासून त्या आरोग्य विभागाच्या क्वार्टरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होत्या. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी त्या वर्धा येथून ये-जा करीत होत्या. घटनेच्या सुमारे 15 दिवसांपूर्वी त्या उब्दा येथील आरोग्य विभागाच्या क्वार्टरमध्ये कुटुंबासह राहण्यासाठी आल्या होत्या.
तक्रारीनुसार, सरीता यांचे पती आशिष खुरसंगे यांना दारू पिण्याची सवय होती. लग्न झाल्यापासून ते शुल्लक कारणावरून वाद करून सरीता यांना मारहाण करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच दारू पिण्यासाठी ते सरीता यांच्याकडे नेहमी पैसे मागत होते. पैसे न दिल्यास त्यांना मारहाण केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
सरीता या आपल्या बहिणी कल्पना मडावी यांच्याकडे आल्यानंतर पतीकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. “माझा पती शुल्लक कारणावरून माझ्यासोबत वाद करून मला नेहमी मारहाण करीत असतो. माझ्या पतीच्या मारण्यापायी मी त्रस्त झाली आहे,” असे त्या सांगत असल्याचे बहिणीने तक्रारीत नमूद केले आहे.
7 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता कल्पना मडावी यांना फोनवरून घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्या तातडीने आपल्या पतीसह उब्दा येथे पोहोचल्या. तेथे पाहणी केली असता सरीता यांचा मृतदेह समुद्रपूर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखाना, समुद्रपूर येथे नेला होता. त्यानंतर तेथे जाऊन पाहणी केली असता मृतकाच्या नाकातून आणि तोंडातून रक्त निघत असल्याचे तसेच चेहरा ओरबाडल्यासारखा दिसत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याच ठिकाणी कल्पना मडावी यांना त्यांचा जावई आशिष खुरसंगे यांनी दारू पिऊन सरीता यांना मारहाण केल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सरीता परचाके खुरसंगे यांनी त्यांच्या राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप बहिणीने केला आहे.
बहिणीच्या तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद आवारे, विकी मस्के आणि संभाजी मूलकर करीत आहेत.

Pratahkal Bureau
प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।
