- साक्षी कुलकर्णी.

Bhoragiri Fort :
भारतमातेसाठी आपला जीवपणाला लावून लढणारे क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म झालेली पावन भूमी म्हणजे खेड होय. राजगुरू यांच्या आदरा प्रित्यर्थ खेड गावचे नामांतर करून राजगुरुनगर असे करण्यात आले आहे. या राजगुरुनगर मध्ये भोरगिरी किल्ला स्थित आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर पासून हा किल्ला ५३ कि.मी. अंतरावर स्थित आहे. हा गिरीदुर्ग भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये विसावलेला आहे तसेच किल्ल्याचा परिसर निसर्ग संपन्न आहे. अवती-भोवतीचे वातावरण शांततामय आहे. या किल्ल्यास भोरगिरी बरोबरच भंवरगिरी नावाने देखील ओळखले जाते.


या किल्ल्यावरून कोकण ते पुणे होणाऱ्या व्यापारी मार्गावर पहारा ठेवला जात होता तसेच किल्ल्याच्या नजीकहून भोरगिरी ते भीमाशंकर आणि भीमाशंकर ते खांडस हा व्यापारी दळणवळणाचा मार्ग जात होता. या सर्व व्यापारी व दळणवळणाच्या मार्गावर भोरगिरी किल्ल्यावरून करडी नजर ठेवली जात असे. या व्यापारी मार्गावर होणाऱ्या सर्व हालचालींवर पहारा ठेवण्याचे काम भोरगिरी किल्ल्यावरून होत होते.


काही इतिहासकारकांच्या मते हा किल्ला लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला होता. यादव कालखंडमध्ये भोरगिरी किल्ला बांधला गेला असल्याचे काही इतिहास नोंदी असल्याचे दिसून येते पण किल्ल्यावर होऊन गेलेल्या राजवटी व त्या राजवटींचा कालावधी यासारख्या अनेक बाबींचा अजूनही उलगडा झाला नाही.


भोरगिरी किल्ल्यावर ९ व्या शतकातील प्राचीन गुहा आजही पहावयास मिळते तसेच गुहेतील शिवलिंग, पाण्याची टाकी, तटबंदी, व्याघ्र शिल्प, पाण्याचे नैसर्गिक कुंड, वीरगळ, कातळात खोदलेल्या पायऱ्या इत्यादी बाबी सुद्धा पहावयास मिळतात. भोरगिरी किल्ला परिचित असला तरीदेखील ऐतिहासिक माहितीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा किल्ला अल्पपरिचित आहे. या किल्ल्यावरून महाराष्ट्र भूमीतील सह्याद्रीच्या विलोभनीय वैभवाचे दर्शन घडते.




Updated On
Sakshi Kulkarni

Sakshi Kulkarni

साक्षी कुलकर्णी, कोल्हापुर की छात्रा, हाल ही में अपनी पोस्ट ग्रेजुएशन पूरी की हैं। इतिहास में गहरी रुचि रखने वाली साक्षी विशेष रूप से छत्रपति शिवाजी महाराज के किलों पर लिखती हैं। उनके लेखों में इन किलों की सैन्य महत्वता, वास्तुकला, और इतिहासिक घटनाओं का बारीकी से वर्णन मिलता है। साक्षी का उद्देश्य पाठकों को न केवल इन किलों की भव्यता का अनुभव कराना है, बल्कि उन्हें मराठा शौर्य और सांस्कृतिक धरोहर की भी जानकारी देना है।

Next Story