साक्षी कुलकर्णी .


इतिहासामध्ये महाराष्ट्राची राजधानी म्हणून सातारा जिल्ह्यास ओळखले जाते. इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा सातारा जिल्हा साक्षीदार आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये संतोषगड स्थित आहे. हा संतोषगड साताऱ्यापासून अवघ्या ५३ कि.मी. अंतरावर आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगेमधील मसोबा डोंगर रांगांच्या कुशीमध्ये संतोषगड विसावलेला आहे. या किल्ल्यास “ताथवडेचा किल्ला” म्हणून देखील ओळखले जाते. किल्ल्यावर सध्या दरवाजा, पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष, तटबंदी, बुरुज, धान्य कोठाराचे अवशेष, इत्यादी महत्त्वाच्या वास्तू इतिहास सांगत उभे असल्याचे दिसून येते.


संतोषगडाजवळील स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि माहितीनुसार हा किल्ला छ. शिवाजी महाराजांनी बांधला होता. १६६६ मध्ये हा किल्ला बजाजी नाईक निंबाळकर यांच्याकडे होता. नंतर संतोषगडवर मोघलाई, मराठी राजवट आणि आदिलशाही यांच्या राजवटी होऊन गेल्या. १६७३ मध्ये हा किल्ला पुन्हा स्वराज्याचा भाग बनला.


संतोषगडाची उंची सुमारे २९०० फूट उंच आहे. हा गड उंचावर आहे त्यामुळे टेहळणी करणे करिता संतोष गड उत्तम ठरत होता. मोळ घाटावर पहारा ठेवत होता तसेच येथून इतर सैन्य दलास धान्य आणि दारूगोळा यांचा पुरवठा केला जाई. सातारा जिल्ह्याच्या पावनभूमीमध्ये असलेला संतोषगड इतिहासामध्ये मोलाची भूमिका बजावणारा सहाय्यक किल्ला ठरला होता.

Updated On
Sakshi Kulkarni

Sakshi Kulkarni

साक्षी कुलकर्णी, कोल्हापुर की छात्रा, हाल ही में अपनी पोस्ट ग्रेजुएशन पूरी की हैं। इतिहास में गहरी रुचि रखने वाली साक्षी विशेष रूप से छत्रपति शिवाजी महाराज के किलों पर लिखती हैं। उनके लेखों में इन किलों की सैन्य महत्वता, वास्तुकला, और इतिहासिक घटनाओं का बारीकी से वर्णन मिलता है। साक्षी का उद्देश्य पाठकों को न केवल इन किलों की भव्यता का अनुभव कराना है, बल्कि उन्हें मराठा शौर्य और सांस्कृतिक धरोहर की भी जानकारी देना है।

Next Story