घनगड : इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा अनोळखी किल्ला
पुणे जिल्ह्याच्या इतिहासाचा आणि गड-किल्ल्यांचा वारसा सांगणारा घनगड हा एक दुर्लक्षित पण महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला एकेकाळी कैद्यांना कैद करण्यासाठी आणि व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी वापरला जात होता.

- साक्षी कुलकर्णी .
पुणे जिल्ह्याला गड-किल्ल्यांचा आणि इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. यापैकी काही किल्ले त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे इतिहासात चमकले असले, तरी काही किल्ले आजही अज्ञात आणि दुर्लक्षित राहिले आहेत. यापैकीच एक आहे घनगड किल्ला, जो पुण्याजवळील एकोले गावाच्या अगदी जवळ वसलेला आहे.
एकोले गावातूनच घनगडाचे विहंगम दृश्य दिसते. हा किल्ला आजही अनेक ऐतिहासिक खुणा जतन करून आहे. इथे आपल्याला वीरगळ, महादेव मंदिर, गारजाई देवी मंदिर, एक शिलालेख, वेताळ मंदिर, मारखिंड, आणि किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळते. या व्यतिरिक्त, किल्ल्यावर कातळ कडा, गुंफा, पाण्याची टाकी, बुरुज आणि जुन्या वाड्यांचे अवशेषही आढळतात.
घनगड कोणी आणि कधी बांधला, याचा निश्चित पुरावा उपलब्ध नाही. मात्र, या किल्ल्याचा सर्वात जुना उल्लेख निजामशाही राजवटीत सापडतो. त्यानंतर हा किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीच्या ताब्यात गेला. १६४७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. मात्र, पुरंदरच्या तहानुसार त्यांना हा किल्ला मोगलांना परत करावा लागला. पुढे, १६७१ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा स्वराज्यात आणला.
इतिहासकारांच्या मते, घनगडाचा उपयोग मुख्यत्वे कैदी आणि गुन्हेगारांना कैद करण्यासाठी केला जात असे. गैरवर्तन करणाऱ्यांना शासन म्हणून येथे डांबले जाई. तसेच, या किल्ल्याचे एक महत्त्वाचे काम म्हणजे पुणे ते कोकण या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणे. या मार्गावरील दळणवळण आणि गुप्त हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला मोक्याच्या ठिकाणी होता. आजही घनगड अनेक अज्ञात कथांचा साक्षीदार म्हणून उभा आहे. जरी तो फारसा परिचित नसला, तरी आपल्या ऐतिहासिक खुणा आणि स्थापत्यशैलीमुळे तो अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा ठिकाण आहे.

Ashiti Joil
यह प्रातःकाल में कंटेंट रायटर अँड एडिटर के पद पर कार्यरत हैं। यह गए 3 सालों से पत्रकारिता और डिजिटल मीडिया में सक्रिय हैं। इन्होंने लोकसत्ता, टाईम महाराष्ट्र, PR और हैट मीडिया में सोशल मीडिया कंटेंट रायटर के तौर पर काम किया है। इन्होंने मराठी साहित्य में मास्टर डिग्री पूर्ण कि है और अभी ये यूनिवर्सिटी के गरवारे इंस्टीट्यूड में PGDMM (Marthi Journalism) कर रही है। यह अब राजकरण, बिजनेस , टेक्नोलॉजी , मनोरंजन और क्रीड़ा इनके समाचार बनती हैं।
