- साक्षी कुलकर्णी

Warugad gad :
सह्याद्रीच्या विशाल डोंगररांगेमध्ये महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा विसावलेला आहे. हा ठेवा म्हणजे महाराष्ट्राच्या पावन भूमीची ओळख होय. सह्याद्रीच्या कुशीतील डोंगर रांगेमध्ये विलोभनीय असा महाराष्ट्राचा ठेवा आहे हा ठेवा म्हणजेच गडकोट होय.

Warugad gad

महाराष्ट्राच्या महादेव डोंगररांगेच्या कुशीमध्ये वारुगड स्थित आहे.वारुगड सातारा जिल्ह्यातील फलटण पासून २७ कि.मी.अंतरावर आहे. सध्या या किल्ल्यावर आपण भैरवनाथ मंदिर, गोमुखी प्रवेशद्वार, पाण्याचे टाके, बुरुज, तटबंदी, तलाव, छोटा बालेकिल्ला, अनेक शिल्पे, जुन्या मंदिराचे अवशेष व दगडी जाते पाहू शकतो.


Warugad gad tourism

वारुगडाच्या इतिहासामध्ये डोकावले असता फारशी माहिती दिसून येत नाही. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ च्या दरम्यान बांधला होता. वारुगडावरून साताऱ्याच्या डोंगररांगेवर आणि परिसरावर लक्ष ठेवले जात होते तसेच येथून कोकण ते कोल्हापूर होणाऱ्या व्यापारी दळणवळणाच्या मार्गावर पहारा दिला जात होता.

Warugad gad

१८१८ मध्ये हा किल्ला साताऱ्याच्या राजाचे फडणवीस विठ्ठलपंत यांच्याकडे होता. पेशवाईनंतर इंग्रजांनी वारुगडावर वर्चस्व मिळवले होते. इंग्रजांनी गडावर आपले वर्चस्व मिळवल्यानंतर गडाची नासधुस देखील केली होती.

ऐतिहासिक माहितीचा फारसा उलगडा न झालेला वारुगड कोकण ते कोल्हापूर व्यापारी मार्गासाठी फार उपयुक्त ठरला होता हे निश्चित. सातारा जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळाबरोबरच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोलाचे योगदान देणारा आणि अल्पपरिचित असणाऱ्या वारुगडास आवश्यक भेट दिली पाहिजे.

Updated On
Sakshi Kulkarni

Sakshi Kulkarni

साक्षी कुलकर्णी, कोल्हापुर की छात्रा, हाल ही में अपनी पोस्ट ग्रेजुएशन पूरी की हैं। इतिहास में गहरी रुचि रखने वाली साक्षी विशेष रूप से छत्रपति शिवाजी महाराज के किलों पर लिखती हैं। उनके लेखों में इन किलों की सैन्य महत्वता, वास्तुकला, और इतिहासिक घटनाओं का बारीकी से वर्णन मिलता है। साक्षी का उद्देश्य पाठकों को न केवल इन किलों की भव्यता का अनुभव कराना है, बल्कि उन्हें मराठा शौर्य और सांस्कृतिक धरोहर की भी जानकारी देना है।

Next Story