शिरपूर : कै. बापूसो एन. झेड. मराठे विधायक संस्था, थाळनेर संचलित अनाथ व निवासी मतिमंद मुलांची कार्यशाळा, वाघाडी (ता. शिरपूर) येथे दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान गणपती आरतीचे आयोजन करण्यात आले. या कालावधीत समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरतीस उपस्थित राहून अनाथ, दिव्यांग व बहुविकलांग मुलांना प्रोत्साहन दिले.

गणपती आरतीस DYSP सुधाकर पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, SBI शाखा व्यवस्थापक राजकुमार चव्हाण, MSEB उपकार्यकारी अभियंता संदीप पवार, आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मंजूसिंग मॅडम, जय लक्ष्मी मॉलचे संचालक संदीप सुखवाणी व त्यांच्या पत्नी जयलक्ष्मी, टोल प्लाझा व्यवस्थापक फनी राजकुमार तसेच आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य अमोल परब यांनी उपस्थिती नोंदवली.

यावेळी मान्यवरांनी संस्थेतील मुलांच्या कलागुणांचे तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व विविध उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेच्या कार्याला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या आपुलकीच्या भेटीमुळे संस्थेतील अनाथ, दिव्यांग व बहुविकलांग मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गणपती आरतीच्या निमित्ताने झालेल्या या उपस्थितीमुळे मुलांना प्रोत्साहन मिळाले असून संस्थेच्या विविध उपक्रमांना मान्यवरांनी दिलेल्या पाठबळाचेही दर्शन घडले.

Pratahkal Bureau

Pratahkal Bureau

प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story