नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील HP गॅस परिसरात वन्यजीवाच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात तीन पिंजरे बसविण्यात आले असून, सामान्य ड्रोन तसेच थर्मल ड्रोनच्या सहाय्याने दिवसा आणि रात्री सातत्याने पाहणी करण्यात आली आहे.

दि. १४ सप्टेंबर रोजी सिन्नर वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी तसेच सुरक्षा प्रभारी श्री. वाघुळे यांनी परिसराची पाहणी करून दोन पिंजरे बसविले. यावेळी वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आला.

दि. १५ सप्टेंबर रोजी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बडगुजर यांच्या समवेत संपूर्ण परिसराची पुन्हा पाहणी करण्यात आली. मागणीनुसार आणखी एक पिंजरा बसविण्यात आला. त्यामुळे परिसरात एकूण तीन पिंजरे तैनात करण्यात आले आहेत.

दि. १६ सप्टेंबर रोजी सहाय्यक वनसंरक्षक यांच्या उपस्थितीत दिवसा तसेच रात्री संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. यासाठी सामान्य ड्रोनसह थर्मल ड्रोनचा वापर करण्यात आला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची प्रत्यक्ष पाहणीही केली. तसेच वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमच्या परिसराची विशेष तपासणी करून तेथे बछड्यांची उपस्थिती आहे का, याची पडताळणी करण्यात आली.

दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी परिसरातील कुंपणाचे काम करण्यात आले. या कामात वन विभागाचे कर्मचारी तसेच HP कंपनीचे कर्मचारी सहभागी झाले.

वन्यजीव-मानव संघर्षाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाशिक TTC केंद्राच्या Eco-Eco संस्थेमार्फत दि. २१ सप्टेंबर रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वन्यजीव आढळल्यास त्याच्या जवळ जाऊ नये किंवा त्यास त्रास देऊ नये आणि तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माळेगाव येथील HP गॅस परिसरात सुरू असलेली ही सातत्यपूर्ण पाहणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.

Pratahkal Bureau

Pratahkal Bureau

प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।

Next Story