नासिक: 1.68 लाख रुपये की 56 ग्राम MD ड्रग्स के साथ दो आरोपी गिरफ्तार
अश्वमेधनगर में एंटी नारकोटिक्स सेल की कार्रवाई, पुलिस रिकॉर्ड पर दर्ज आरोपी दर्शन गायकवाड़ और साथी से दोपहिया वाहन भी जब्त।

तस्वीर में रात के समय पूछताछ और जांच करते पुलिस अधिकारी दिख रहे हैं।
नाशिक शहरात अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरू असलेल्या पोलिसांच्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. दर्शन गोरख गायकवाड (२२, रा. मातोरी) आणि रोशन दिनकर लोखंडे (२३) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल ५६ ग्रॅम एमडी पावडर, अंदाजे १ लाख ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील पेठरोड परिसरातील अश्वमेधनगर रिक्षा थांब्यासमोर काही युवक एमडी ड्रग्जच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह पथकाने रात्री परिसरात गस्त घालत सापळा रचला.
दरम्यान, एमएच १५ एचटी ३४२३ क्रमांकाच्या दुचाकीवरून दोन तरुण मोकळ्या जागेत येऊन थांबले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने साध्या वेशातील पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर अंगझडती घेतली असता दर्शन गायकवाड याच्याकडे एमडी पावडर आढळून आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ नेमका कोठून आणण्यात आला होता आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित दर्शन गायकवाड हा पोलिस रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात दोन, तर दिंडोरी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.
अमली पदार्थांची विक्री आणि वितरण करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात पोलीस करत आहेत.

Pratahkal Bureau
प्रातःकाल ब्यूरो, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, सामयिक और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा ब्यूरो राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।
