मुरगुड में 35वां विश्व वरिष्ठ नागरिक दिवस आयोजित, 75 से अधिक आयु के बुजुर्ग सम्मानित
मुरगुड शहर वरिष्ठ नागरिक संघ के कार्यक्रम में पूर्व प्राचार्य डॉ. जयंत कलके ने बुजुर्गों को सेहत की देखभाल और नई पीढ़ी से सकारात्मक संवाद की सलाह दी।

मुरगुड में आयोजित कार्यक्रम के दौरान एक-दूसरे को गुलाब का फूल भेंट करते वरिष्ठ नागरिक।
ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याचे मंडलिक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जयंत कळके यांनी कौतुक केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ३५ वा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संघातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच आयुष्मान वयो वंदना कार्ड व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलितमित्र डी. डी. चौगले होते. यावेळी माजी प्राचार्य डॉ. जयंत कळके, गजाननराव गंगापुरे, पी. डी. मगदूम, सखाराम सावर्डेकर, शिवाजी सातवेकर आदी प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. जयंत कळके म्हणाले, “ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. शारीरिक व्यसनांपासून जितके दूर राहता येईल, तितके ज्येष्ठ नागरिकांसाठी हितकारक आहे. प्रभुत्ववादाची भूमिका सोडून नव्या पिढीशी सकारात्मक दृष्टिकोनातून वागल्यास संघर्ष टळून जीवन अधिक सुखकर होईल. या वयात ज्येष्ठांना सहवास आणि सहकार्याची गरज असते.”
दलितमित्र डी. डी. चौगले म्हणाले, “आई-वडिलांची सेवा करणे हे काही जणांना चुकीचे किंवा ओझे वाटते. त्यामुळेच अनेक ज्येष्ठ नागरिक समाधान आणि आपलेपणा मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघात येतात.”
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक अशोक डवरी, एम. टी. सामंत, किशोरकुमार पाटील, रंगराव चौगले, तुकाराम भारमल, शिवाजी कांबळे, सिकंदर जमादार, सदाशिव एकल, महादेव वागवेकर, महादेव कानकेकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत संचालक जयवंत हावळ यांनी केले. पाहुण्यांची ओळख संघाचे उपाध्यक्ष पी. डी. मगदूम यांनी करून दिली. प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी केले. सूत्रसंचालन कोजिमाशी संचालक अविनाश चौगले यांनी केले, तर सखाराम सावर्डेकर यांनी आभार मानले.

Vijay Morbale, Kolhapur
पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)
शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा
परिचय:
विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।
कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:
विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।
पत्रकारिता का दृष्टिकोण:
सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।
ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।
