मुरगुड विद्यालय में छात्राओं के लिए विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित
मुरगुड विद्यालय और सुशीलादेवी फाउंडेशन के संयुक्त तत्वावधान में छात्राओं को आरोग्य, स्वच्छता और अनुशासन के प्रति जागरूक किया गया।

मुरगुड विद्यालय, कोल्हापुर में छात्राओं के लिए आयोजित मार्गदर्शन सत्र के दौरान मंच पर संबोधित करते हुए वक्ता और उपस्थित शिक्षक।
कोल्हापूर : विजय मोरबाळे
शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, मुरगूड येथे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आरोग्य, स्वच्छता आणि शिस्तीवर आधारित विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांना शिस्तप्रिय आणि गुणवंत बनवण्याच्या उद्देशाने सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन आणि विद्यालय प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला गेला. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, उपाध्यक्षा सौ. अंजली देसाई आणि सचिव सौ. ऋतुजा पृथ्वी मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. यू. सी. पाखरे आणि पर्यवेक्षक एस. डी. साठे यांनी शिस्त, वेळेचे नियोजन, वैयक्तिक स्वच्छता, अभ्यासातील सातत्य आणि शालेय नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला. "शिस्त हेच यशाचे मूळ गमक आहे," असे प्रतिपादन करत त्यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक प्रगतीसह नियमित उपस्थिती, शालेय गणवेशाचा उचित वापर आणि प्रार्थनेस वेळेत उपस्थित राहण्यासह स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.
सत्रादरम्यान सौ. व्ही. एस. सूर्यवंशी-पाटील, सौ. एस. जे. गावडे आणि एस. पी. बाईत यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आपली मनोगते व्यक्त केली. या उपक्रमाप्रसंगी ए. एम. कोळी, भाग्यश्री मुसाई, संजीवनी भोई, कल्पना पाटील, वैशाली गुरव, गीतांजली पाटील, अश्विनी गोरूले, नंदा सारंग, टी. एस. पाटील, यू. पी. कांबळे, जे. टी. पवार, शामली डेळेकर, एस. एस. पाटील आणि एल. के. पाटील यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. विद्यार्थिनींनी या मार्गदर्शन सत्राला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, या उपक्रमामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Pratahkal Newsroom
प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।
