कोल्हापूर : विजय मोरबाळे

मुरगूड (ता. कागल) येथील सरपिराजीराव रोडवरील मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पद्म पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख (काका) यांच्या हस्ते फित कापून नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक धोंडीबा उर्फ बाळासाहेब मकानदार होते.

डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताना एम.जे. लकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकासह वाद्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उद्योजक तानाजीराव सूर्यवंशी यांच्या हस्ते संस्थेतील अद्ययावत लॉकर्सचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे चेअरमन जावेद मकानदार यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “अवघ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात संस्थेने १७ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून सहकार क्षेत्रात संस्थेची गरुडझेप सुरू आहे.”

मुदतबंद ठेव, मुरगूड नागरी लक्ष्मी दामदुप्पट ठेव, मुरगूड नागरी लखपती योजना, सुवर्ण ठेव योजना यांसह सोने तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज, सभासद कर्ज आणि व्यापारवृद्धीसाठी कर्ज अशा विविध योजना संस्थेमार्फत राबविल्या जात असल्याचे जावेद मकानदार यांनी सांगितले. सभासद व हितचिंतकांच्या विश्वासास पात्र ठरत संस्थेची वाटचाल सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सामाजिक बांधिलकी जपत मुरगूड येथील विठ्ठल मंदिरासाठी २५ टाळ खरेदी करण्याकरिता ११ हजार रुपयांचा धनादेश चंद्रकांत तिकोडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. तसेच संस्थेच्या सर्व सभासदांना सुमारे ५०० ग्रॅम वजनाचे स्टील ताट मान्यवरांच्या हस्ते भेट म्हणून वितरित करण्यात आले.

कार्यक्रमास मुरगूड नगरपरिषदेचे गटनेते सुहास खराडे, पांडुरंग कुडवे, निवास कदम, वाय.एस. पाटील (सुरूपलीकर), जोतिराम सूर्यवंशी, वस्ताद आनंदा गोधडे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संचालक डॉ. संजय रामशे, रियाज ताशिलदार, सचिन जाधव, राजेंद्र बुरुड, नवीज खेडेकर, दिलीप सोनुले, संचालिका कांचन खराडे, ज्योती शिंदे यांच्यासह कर्मचारी, सभासद, ठेवीदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक अजितकुमार कापसे यांनी केले, तर आभार ऋषिकेश गोडबोले यांनी मानले.

मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेच्या नूतनीकरणामुळे संस्थेच्या वाढत्या कारभाराला नवे रूप मिळाले असून, दीड वर्षात १७ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठल्याने संस्थेची सहकार क्षेत्रातील वाटचाल अधोरेखित झाली आहे.

फोटो : मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखेच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करताना डॉ. श्रीकृष्ण देशमुख, धोंडीबा उर्फ बाळासाहेब मकानदार, तानाजीराव सूर्यवंशी, जावेद मकानदार व अन्य मान्यवर.

Vijay Morbale, Kolhapur

Vijay Morbale, Kolhapur

पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)

शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा

परिचय:

विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।

कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:

विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।

पत्रकारिता का दृष्टिकोण:

सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।

ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।

Next Story