लातूर : ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होताच जिल्ह्यात राजकीय धुरळा उडाला आहे. दुपारी हाती आलेल्या निकालांनी कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत न देता मतदारांनी सर्वच पक्षांना विचार करायला भाग पाडले आहे.

एकूण ५९ जागांच्या या जिल्हा परिषदेत काँग्रेस २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपाने २१ जागा मिळवत जोरदार टक्कर दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला १२ जागांवर विजय मिळाला असून, सत्तेच्या समीकरणात हा गट निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

निवडणूक निकालांची आकडेवारी या निवडणुकीचे विशेष म्हणजे इतर पक्षांना मिळालेल्या जागा खालीलप्रमाणे आहेत:
  • उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना: १ जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: १ जागा
  • मनसे: १ जागा
  • शिवसेना शिंदे गट: १ जागा
  • अपक्ष: २ जागा
तालुकानिहाय निकालांचे चित्र लातूर तालुका: १० गटांपैकी तब्बल ८ जागा काँग्रेसने जिंकत वर्चस्व सिद्ध केले. भाजपाला १ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १ जागा मिळाली. औसा तालुका: ९ जागांपैकी काँग्रेसने ४, भाजपाने ४ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १ जागा जिंकली. निलंगा तालुका: भाजपाने ४ जागा मिळवत आघाडी घेतली, तर काँग्रेसला ३, अजित पवार गटाला १, अपक्षाला १ आणि शिवसेना शिंदे गटाला १ जागा मिळाली. देवणी तालुका: ३ जागांपैकी २ भाजपाने आणि १ काँग्रेसने जिंकली. उदगीर तालुका: काँग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपाने २ आणि अजित पवार गटाने ३ जागांवर विजय मिळवला. जळकोट तालुका: काँग्रेसने २ जागा जिंकल्या, तर १ जागा अपक्षाच्या वाट्याला गेली. येथे भाजप किंवा राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. चाकूर तालुका: भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रत्येकी ४ जागांवर विजय मिळवला. अहमदपूर तालुका: ६ जागांपैकी भाजपाला २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १ जागा मिळाली. सत्तासमीकरण आणि पुढील वाटचाल या निकालामुळे जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्तास्थापनेसाठी इतर पक्षांची साथ आवश्यक ठरणार आहे. मतदारांनी दिलेला हा कौल म्हणजे एकाच पक्षाला सत्ता न देता सर्वांनी मिळून काम करावे, असा स्पष्ट संदेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. लातूरच्या मिनी मंत्रालयात आता पुढे कोणाची सत्ता येणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

"लातूर जिल्हा परिषदेत निकालांचा धुराळा, मिनी मंत्रालयात कोणाचाही एकहाती विजय नाही; काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, भाजप जवळपास, अजित पवार गट किंगमेकरच्या भूमिकेत"

Limbraj Panhalkar (Latur)

Limbraj Panhalkar (Latur)

नाम: लिंबराज शिवराम पन्हाळकर

वर्तमान पद: जिला रिपोर्टर (लातूर)

कार्यक्षेत्र: लातूर (महाराष्ट्र)

बीट : क्राइम (अपराध) एवं सभी प्रकार की रिपोर्टिंग

अनुभव: 20 साल

परिचय

लिंबराज शिवराम पन्हाळकर महाराष्ट्र के लातूर जिले के एक वरिष्ठ और अनुभवी समाचार संवाददाता हैं। वह वर्तमान में लातूर जिला रिपोर्टर के रूप में अपनी सेवाएं दे रहे हैं। लिंबराज पन्हाळकर क्षेत्र की सभी प्रकार की प्रशासनिक और स्थानीय खबरों को कवर करते हैं, लेकिन मुख्य रूप से क्राइम (अपराध) से जुड़ी खबरों की रिपोर्टिंग में उनकी विशेष रुचि और विशेषज्ञता है।

पत्रकारिता का अनुभव (Work Experience)

लिंबराज पन्हाळकर को मीडिया और ग्राउंड रिपोर्टिंग के क्षेत्र में 20 वर्षों का एक लंबा और गहरा अनुभव है। दो दशकों से लातूर क्षेत्र में सक्रिय रहने के कारण स्थानीय मुद्दों, कानून-व्यवस्था और क्षेत्रीय गतिविधियों पर उनकी मजबूत पकड़ है।

शैक्षणिक योग्यता (Education)

बी.ए. जर्नलिज्म (B.A. in Journalism): उन्होंने पत्रकारिता विषय में स्नातक (Graduation) की डिग्री हासिल की है।

Next Story