लातूर श्री सिद्धेश्वर और रत्नेश्वर यात्रा महोत्सव 15 फरवरी से होगा शुरू
लातूर के ग्रामदैवत मंदिर में 15 फरवरी से 2 मार्च तक धार्मिक, सांस्कृतिक और कृषि कार्यक्रमों का आयोजन होगा, जिसमें महाशिवरात्रि पर दुग्धाभिषेक मुख्य आकर्षण है।

लातूर में आगामी श्री सिद्धेश्वर और रत्नेश्वर यात्रा महोत्सव की तैयारियों की समीक्षा करते प्रशासक सचिन जांबूतकर और देवस्थान के विश्वस्त मंडल।
लातूर/प्रतिनिधी: ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी ते २ मार्च यादरम्यान पार पडणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून "या यात्रा महोत्सवात अधिका अधिक भाविक व नागरिकांना सहभाग नोंदवावा" असे आवाहन प्रशासक सचिन जांबूतकर यांच्या विश्वस्तांनी केले आहे.
महोत्सवाचा प्रारंभ आणि मुख्य विधी
राज्यभर परिचित असलेल्या लातूर येथील श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर यात्रा महोत्सव महाशिवरात्रीदिनी म्हणजेच दि. १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या महोत्सवानिमित्त शनिवार मध्यरात्री व रविवार पहाटे गवळी समाजाच्या वतीने श्री सिध्देश्वरास दुग्धाभिषेक होणार आहे. यानंतर श्रीच्या दर्शन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.
- रविवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या हस्ते श्रीची महापुजा होवून झेंडावंदनाने यात्रा महोत्सवास प्रारंभ होणार आहे.
- संत सावतामाळी भजनीमंडळ व माळी समाजाच्या वतीने माळी गल्ली येथून मिरवणूक निघून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
- रविवार दि. १५ रोजी दुपारी १ वाजता मार्केट यार्ड परिसरातील गौरीशंकर मंदीर येथून पारंपारिक झेंड्यांच्या काठ्याची मिरवणूक निघणार आहे. सदर मिरवणूकीचा समारोप श्री सिध्देश्वर मंदीर येथे होणार आहे.
कीर्तन आणि भजन कार्यक्रमांची रूपरेषा
महोत्सवात दररोज नामवंत कीर्तनकार आणि गायकांचे कार्यक्रम होणार आहेत:
- १५ फेब्रुवारी: रात्री ९ ते ११ हभप श्री संजय महाराज खडक उमरगेकर यांचे किर्तन; रात्री ११ ते १ सुरमणी बाबुराव बोरगावकर व तालमणी रामभाऊ बोरगावकर यांचे संगीत भजन.
- १६ फेब्रुवारी: विरशैव तेली समाज बांधवांतर्फे श्रीस गंगेच्या पाण्याचा अभिषेक; संध्याकाळी हभप श्री माऊली महाराज कदम (आळंदी) यांचे किर्तन.
- १७ फेब्रुवारी: हभप श्री ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर यांचे किर्तन.
- १८ फेब्रुवारी: हभप श्री गुरुवर्य पुंडलीक महाराज देहूकर यांचे किर्तन.
- १९ फेब्रुवारी: रात्री ९ वाजता हभप श्री गुरुराज महाराज देगलुरकर यांचे किर्तन.
- २० फेब्रुवारी: हभप श्री गोपाळअण्णा महाराज वासकर (पंढरपुर) यांचे किर्तन.
- २१ फेब्रुवारी: सायंकाळी ६ ते ८ हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन; रात्री ९ वाजता हभप विजयानंद महाराज सुपेकर यांचे किर्तन.
महिला विशेष आणि सांस्कृतिक कार्यक्रम
रविवार दि. २२ रोजी सकाळी ११ ते ४ या दरम्यान १००१ महिलांच्या उपस्थितीत श्रीस रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. तसेच यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केलेले आहे. याच दिवशी रात्री ८ वाजता शिवरुद्र स्वामी यांची संगीत भजनी होणार आहे.
पुढील कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत:
- २३ फेब्रुवारी: सचिन जाधव व वैष्णवी बरकते यांचे भजन.
- २४ फेब्रुवारी: संतोष थोरात (लातूर) यांचे संगीत भजन.
- २५ फेब्रुवारी: डॉ. दत्ता राजे यांचे संगीत भजन.
- २६ फेब्रुवारी: विठ्ठलराव जगताप यांचे संगीत भजन.
कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन आणि स्पर्धा
गुरुवार दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता कृषी प्रदर्शनाचे, तसेच पशु व पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून उत्कृष्ट पशु व पक्षींची निवड स्पर्धा पार पडणार आहे.
शुक्रवार दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता पशु, अश्व व श्वान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत निवड झालेल्या पशुंना लातूर बाजार समितीच्या वतीने चांदीचा रथ देण्यात येणार असून पशु मालकास प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
शनिवार दि. २८ रोजी सुरमणी भुजंग मुर्के तर रविवार दि. १ मार्च रोजी श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. याच दिवशी (१ मार्च) सकाळी ११.३० पासून कुस्ती स्पर्धांचा फड रंगणार आहे.
महोत्सवाचा समारोप
सोमवार दि. २ मार्च रोजी रात्री ८ वाजता उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांच्या उपस्थितीत शोभेच्या दारुची आतिषबाजी करून यात्रा महोत्सवाचा समारोप होणार आहे. रात्री ९ ते ११ पंढरपूर येथील हभप माधव महाराज शिवणीकर यांचे काल्याचे किर्तन पार पडणार असून यानंतर श्रीची मिरवणूक, दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विशेष सुविधा आणि आवाहन
रक्तदात्यास थेट दर्शन: "यात्रा महोत्सवानिमित्त लातूर येथील डॉ. भालचंद्र ब्लड बँकेच्या वतीने देवस्थान परिसरात महाशिवरात्री दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाशिवरात्री दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी असते, त्यामुळे रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या दात्यास थेट दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. अधिकाधिक भाविकांनी रक्तदान करावे," असे आवाहन करण्यात आले आहे.
यात्रा महोत्सवात आनंद मेळा, खाद्यपदार्थ व साहित्यांचे स्टॉल हे आकर्षण राहणार आहेत. प्रशासक सचिन जांबूतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी, प्रदीप राठी, मन्मथ लोखंडे, बाबासाहेब कोरे, अशोक भोसले, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, चंद्रकांत परदेशी व व्यंकटेश हालिंगे यांनी आवाहन केले आहे की: "या यात्रा महोत्सवात लातूर व परजिल्ह्यासह परराज्यातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे."

Limbraj Panhalkar (Latur)
नाम: लिंबराज शिवराम पन्हाळकर
वर्तमान पद: जिला रिपोर्टर (लातूर)
कार्यक्षेत्र: लातूर (महाराष्ट्र)
बीट : क्राइम (अपराध) एवं सभी प्रकार की रिपोर्टिंग
अनुभव: 20 साल
परिचय
लिंबराज शिवराम पन्हाळकर महाराष्ट्र के लातूर जिले के एक वरिष्ठ और अनुभवी समाचार संवाददाता हैं। वह वर्तमान में लातूर जिला रिपोर्टर के रूप में अपनी सेवाएं दे रहे हैं। लिंबराज पन्हाळकर क्षेत्र की सभी प्रकार की प्रशासनिक और स्थानीय खबरों को कवर करते हैं, लेकिन मुख्य रूप से क्राइम (अपराध) से जुड़ी खबरों की रिपोर्टिंग में उनकी विशेष रुचि और विशेषज्ञता है।
पत्रकारिता का अनुभव (Work Experience)
लिंबराज पन्हाळकर को मीडिया और ग्राउंड रिपोर्टिंग के क्षेत्र में 20 वर्षों का एक लंबा और गहरा अनुभव है। दो दशकों से लातूर क्षेत्र में सक्रिय रहने के कारण स्थानीय मुद्दों, कानून-व्यवस्था और क्षेत्रीय गतिविधियों पर उनकी मजबूत पकड़ है।
शैक्षणिक योग्यता (Education)
बी.ए. जर्नलिज्म (B.A. in Journalism): उन्होंने पत्रकारिता विषय में स्नातक (Graduation) की डिग्री हासिल की है।
