लातूर: जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री पूर्णपणे हद्दपार करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या दोन दिवसांत धडक कारवाई करत सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी हातभट्टी दारू आणि देशी दारूच्या साठ्यासोबतच गावठी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे हजारो लिटर गुळमिश्रित फसफसते रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ट केले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील विविध पथकांनी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी छापेमारी करून ही कारवाई फत्ते केली.

लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत गजानन सदाशिव हेरकर (रा. नळेगाव, ता. चाकूर) याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह, तर अलीम सत्तार शेख (रा. झिन्नत सोसायटी, नांदेड रोड, लातूर) याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात अटक करण्यात आली. या मोहिमेत कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे लक्ष्मण तिपन्ना उमापुरे यांच्या शेतातून गावठी दारू निर्मितीसाठी साठवलेले सुमारे ५०० लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर तांड्यात दोन स्वतंत्र कारवाया करत पोलिसांनी नाथू रामभाऊ राठोड यांच्याकडून ३०० लिटर आणि शिलाबाई शिवाजी जाधव यांच्या शेतातून २५० लिटर रसायन जप्त केले.

देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार (रा. शेळगाव, ता. चाकूर) याच्याविरुद्ध कारवाई करून "भिंगरी संत्रा" कंपनीच्या ४८ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याच परिसरात गंगाराम रोहिदास माने (रा. वडगाव एक्की, ता. चाकूर) याच्याकडूनही ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या, तर जळकोट पोलीस ठाणे हद्दीत कोणताही वैध परवाना नसताना दारूची विक्री करणाऱ्या शेख सलीम महेबुब (रा. नवी आबादी, जळकोट) याला २१ बाटल्यांसह ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सर्व दारू आणि रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून, उर्वरित अवैध साठा पंचासमक्ष नष्ट करण्यात आला आहे. सर्व संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेबाबत बोलताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि समाजविघातक धंद्यांविरोधातील ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील.

Limbraj Panhalkar (Latur)

Limbraj Panhalkar (Latur)

नाम: लिंबराज शिवराम पन्हाळकर

वर्तमान पद: जिला रिपोर्टर (लातूर)

कार्यक्षेत्र: लातूर (महाराष्ट्र)

बीट : क्राइम (अपराध) एवं सभी प्रकार की रिपोर्टिंग

अनुभव: 20 साल

परिचय

लिंबराज शिवराम पन्हाळकर महाराष्ट्र के लातूर जिले के एक वरिष्ठ और अनुभवी समाचार संवाददाता हैं। वह वर्तमान में लातूर जिला रिपोर्टर के रूप में अपनी सेवाएं दे रहे हैं। लिंबराज पन्हाळकर क्षेत्र की सभी प्रकार की प्रशासनिक और स्थानीय खबरों को कवर करते हैं, लेकिन मुख्य रूप से क्राइम (अपराध) से जुड़ी खबरों की रिपोर्टिंग में उनकी विशेष रुचि और विशेषज्ञता है।

पत्रकारिता का अनुभव (Work Experience)

लिंबराज पन्हाळकर को मीडिया और ग्राउंड रिपोर्टिंग के क्षेत्र में 20 वर्षों का एक लंबा और गहरा अनुभव है। दो दशकों से लातूर क्षेत्र में सक्रिय रहने के कारण स्थानीय मुद्दों, कानून-व्यवस्था और क्षेत्रीय गतिविधियों पर उनकी मजबूत पकड़ है।

शैक्षणिक योग्यता (Education)

बी.ए. जर्नलिज्म (B.A. in Journalism): उन्होंने पत्रकारिता विषय में स्नातक (Graduation) की डिग्री हासिल की है।

Next Story