लातूर: लातूर तालुक्यातील खंडापूर येथे २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित भव्य पादुका दर्शन सोहळ्यात जमा झालेल्या देणगी रकमेत कोट्यवधी रुपयांचा कथित अपहार झाल्याचा गंभीर आरोप करत, दोषींवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने परिसरात खळबळ उडवून दिली आहे.

पोलीस प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी भाविक, वारकरी, विविध सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या जमा करण्यात आल्या होत्या. मात्र, या निधीचे संकलन आणि खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. खंडापूर येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यांमधून लाखो वारकरी सहभागी झाले होते. संत-महंतांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाचा लाभ अंदाजे ६० लाखांहून अधिक भाविकांनी घेतला होता. नियोजनाच्या दृष्टीने सुमारे ३७०० देणगी पुस्तिका छापण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक पावतीची रक्कम पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, देणगी आणि आर्थिक मदत गोळा करण्यासाठी विविध भागांत पथके कार्यरत होती. याव्यतिरिक्त दानपेट्यांमधूनही मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला. केवळ दानपेट्यांमधूनच अंदाजे पाच कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचा अंदाज असून, देणगी पावत्यांच्या माध्यमातूनही कोट्यवधी रुपयांचा निधी उभारला गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, जमा झालेला निधी नेमका कोणत्या बँक खात्यात वळवला गेला, त्यासाठी कोणाची परवानगी होती आणि खर्चाचा तपशील काय, याचा पारदर्शक हिशोब सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, संबंधित संस्थेचे बँक खाते गोठवून संचालकांच्या मालमत्ता व व्यवहारांची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

"भाविकांनी श्रद्धा आणि भक्तिभावातून दिलेल्या दानाचा गैरवापर होणे हा केवळ आर्थिक गुन्हा नसून लाखो भक्तांच्या भावनांशी केलेला विश्वासघात आहे," अशी संतप्त भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात पृथ्वीराजसिंह पाटील खंडापूरकर, अमोल नानजकर, ॲड. राणीताई स्वामी, रामभाऊ पवार, नेताजी जाधव, काशीबाई हांडे, रामेश्वर डोणे, नागेश जाधव, जयश्री भुत्तेकर, सुरेखा गाडेकर, टीनाताई शिंदे, महेश चामे, तुषार रेड्डी, मोक्षदा भंडारकवटे, अमोल भालेराव, महेश पाटील, वैभव घोबाळे आणि पृथ्वीराज पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. "दानाचा हिशोब द्या, दोषींना शिक्षा द्या" अशा घोषणांनी एमआयडीसी पोलीस ठाणे परिसर दणाणून गेला होता. पारदर्शकतेचा आग्रह धरत भक्तांच्या श्रद्धेचा मान राखण्यासाठी पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Limbraj Panhalkar (Latur)

Limbraj Panhalkar (Latur)

नाम: लिंबराज शिवराम पन्हाळकर

वर्तमान पद: जिला रिपोर्टर (लातूर)

कार्यक्षेत्र: लातूर (महाराष्ट्र)

बीट : क्राइम (अपराध) एवं सभी प्रकार की रिपोर्टिंग

अनुभव: 20 साल

परिचय

लिंबराज शिवराम पन्हाळकर महाराष्ट्र के लातूर जिले के एक वरिष्ठ और अनुभवी समाचार संवाददाता हैं। वह वर्तमान में लातूर जिला रिपोर्टर के रूप में अपनी सेवाएं दे रहे हैं। लिंबराज पन्हाळकर क्षेत्र की सभी प्रकार की प्रशासनिक और स्थानीय खबरों को कवर करते हैं, लेकिन मुख्य रूप से क्राइम (अपराध) से जुड़ी खबरों की रिपोर्टिंग में उनकी विशेष रुचि और विशेषज्ञता है।

पत्रकारिता का अनुभव (Work Experience)

लिंबराज पन्हाळकर को मीडिया और ग्राउंड रिपोर्टिंग के क्षेत्र में 20 वर्षों का एक लंबा और गहरा अनुभव है। दो दशकों से लातूर क्षेत्र में सक्रिय रहने के कारण स्थानीय मुद्दों, कानून-व्यवस्था और क्षेत्रीय गतिविधियों पर उनकी मजबूत पकड़ है।

शैक्षणिक योग्यता (Education)

बी.ए. जर्नलिज्म (B.A. in Journalism): उन्होंने पत्रकारिता विषय में स्नातक (Graduation) की डिग्री हासिल की है।

Next Story