कोरपना: नए थानेदार विनोद राहगंडाले का अवैध कारोबार पर शिकंजा, मचा हड़कंप
महाराष्ट्र के कोरपना में नए थाना प्रभारी ने सट्टा, अवैध रेत खनन और शराब बिक्री के खिलाफ सख्त अभियान शुरू किया है।

तस्वीर में थानेदार विनोद राहगंडाले, कोरपना पुलिस स्टेशन की इमारत और ग्राफिक्स दिख रहे हैं।
कोरपना तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात नवनियुक्त ठाणेदार विनोद राहगंडाले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कडक भूमिका घेतल्याचे चित्र आहे. पोलिसांची कारवाईची भूमिका स्पष्ट होताच अवैध व्यवसायाशी संबंधित वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या वाढलेल्या हालचालींमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
विशेषतः वनसडी परिसरात सट्टापट्टी सुरू असल्याच्या चर्चेला पोलिसांच्या कडक भूमिकेनंतर काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. यापूर्वी अवैध व्यवसायांच्या तक्रारींमुळे चर्चेत असलेल्या या परिसरात आता पोलिसांची करडी नजर असल्याने संबंधितांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, अवैध रेती तस्करीवरही पोलिसांची विशेष नजर असल्याचे दिसून येत आहे. नदीपात्रातून विनापरवाना रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याने रेती तस्करांमध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
यासोबतच अवैध दारू विक्री, मटका, सट्टा, सुगंधित तंबाखूची विक्री तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची नजर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तालुक्यातील नागरिकांनीही अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवनियुक्त ठाणेदार विनोद राहगंडाले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कोरपना तालुक्यातील अवैध व्यवसायांना आळा बसणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Manoj Gore (Chandrapur)
नाम: मनोज रामकृष्ण गोरे
वर्तमान पद: रिपोर्टर (प्रातःकाल)
कार्यक्षेत्र: चंद्रपुर जिला (महाराष्ट्र)
बीट (मुख्य विषय): प्रशासन
परिचय
मनोज रामकृष्ण गोरे महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से 'प्रातःकाल' समाचार पत्र के रिपोर्टर हैं। वह मुख्य रूप से चंद्रपुर जिले के प्रशासनिक विभागों की कार्यप्रणाली, सरकारी योजनाओं, जनसुनवाई, विकास कार्यों और प्रशासनिक निर्णयों से जुड़ी खबरों को कवर करते हैं।
पत्रकारिता का अनुभव
मनोज रामकृष्ण गोरे को मीडिया क्षेत्र में ग्राउंड रिपोर्टिंग और समाचार संकलन का 5 वर्ष का अनुभव है। वह पिछले पांच सालों से चंद्रपुर जिले के स्थानीय और प्रशासनिक मुद्दों को नियमित रूप से रिपोर्ट कर रहे हैं।
शैक्षणिक योग्यता (Education)
उन्होंने कला स्नातक (B.A.) की डिग्री हासिल की है।
