क्षमता से अधिक यात्री और प्रशासन की अनदेखी

कोरपणा (ता. प्रतिनिधी): कोरपणा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून वाहतूक केली जात असल्याचे प्रकार सर्रास दिसून येत आहेत. वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असताना संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी, सामान्य नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.

ताजी घटना: कन्हाळगाव बस स्थानकाजवळ भीषण अपघात

  • आज शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळगाव बस स्थानकाजवळ प्रवासी वाहतूक करणारा एक ऑटो पलटी झाला.
  • या अपघातात ऑटोमध्ये कोंबून बसविण्यात आलेल्या अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

धोकादायक प्रवास आणि प्रवाशांची मजबुरी

राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या अनेक ऑटोमध्ये ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसवले जात आहेत. काही ठिकाणी ऑटोच्या पायऱ्यांवर उभे राहून, तर काही ठिकाणी दरवाज्यात लटकून प्रवास केला जातो. विशेषतः सकाळ व सायंकाळच्या वेळेत शाळकरी विद्यार्थी, महिला व कामगार मोठ्या प्रमाणात अशा धोकादायक प्रवासाला मजबूर होत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढून वारंवार दुर्घटना घडत आहेत.

पोलीस विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

अतिवेग, नियमभंग व बेजबाबदार वाहनचालक यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा गोंधळ निर्माण होत असून अपघातांची मालिका सुरू आहे. मात्र, या प्रकारांकडे कोरपणा पोलीस विभागाकडून अपेक्षित ती कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पोलिसांच्या नियमित तपासण्या व कारवाईअभावी ऑटोचालकांचे फावले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नागरिकांची मागणी आणि इशारा

"या पार्श्वभूमीवर, कोरपणा पोलीस प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पालक वर्गाकडून होत आहे. अन्यथा, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे."


Manoj Gore (Chandrapur)

Manoj Gore (Chandrapur)

नाम: मनोज रामकृष्ण गोरे

वर्तमान पद: रिपोर्टर (प्रातःकाल)

कार्यक्षेत्र: चंद्रपुर जिला (महाराष्ट्र)

बीट (मुख्य विषय): प्रशासन

परिचय

मनोज रामकृष्ण गोरे महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से 'प्रातःकाल' समाचार पत्र के रिपोर्टर हैं। वह मुख्य रूप से चंद्रपुर जिले के प्रशासनिक विभागों की कार्यप्रणाली, सरकारी योजनाओं, जनसुनवाई, विकास कार्यों और प्रशासनिक निर्णयों से जुड़ी खबरों को कवर करते हैं।

पत्रकारिता का अनुभव 

मनोज रामकृष्ण गोरे को मीडिया क्षेत्र में ग्राउंड रिपोर्टिंग और समाचार संकलन का 5 वर्ष का अनुभव है। वह पिछले पांच सालों से चंद्रपुर जिले के स्थानीय और प्रशासनिक मुद्दों को नियमित रूप से रिपोर्ट कर रहे हैं।

शैक्षणिक योग्यता (Education)

उन्होंने कला स्नातक (B.A.) की डिग्री हासिल की है।

Next Story