कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात राबविलेल्या धडक मोहिमेत एकाच दिवसात दोन महत्त्वपूर्ण कारवाया करत गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि गांजाचा साठा जप्त करण्यात आला असून, एकूण ७५ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २४ जून रोजी सकाळी राशिवडे बुद्रुक येथील तिरंगा पान शॉपवर अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संयुक्त छापा टाकण्यात आला. या कारवाईत प्रकाश नरहरी गोंगाणे याच्याकडे विक्रीसाठी साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी या ठिकाणाहून ५५ हजार २० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

एकाच दिवशी झालेली दुसरी कारवाई रात्रीच्या सुमारास सरवडे येथे करण्यात आली. सरवडे गावात एका घरात गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत अक्षय अशोक सुतार (वय ३१) याला एक किलो २० ग्रॅम गांजासह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या गांजासह एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण २० हजार २२० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपी अक्षय सुतारविरुद्ध अमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, राधानगरी पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.

राधानगरी पोलिसांनी अवैध गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरू केलेल्या या धडक मोहिमेचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. राधानगरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून, परिसरातील बेकायदा धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Vijay Morbale, Kolhapur

Vijay Morbale, Kolhapur

पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)

शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा

परिचय:

विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।

कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:

विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।

पत्रकारिता का दृष्टिकोण:

सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।

ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।

Next Story