कोल्हापूर: म्हाकवेत 'लव्ह जिहाद'च्या आरोपावरून मोठा तणाव, आंदोलनानंतर तरुणी पालकांच्या स्वाधीन
कोल्हापूरच्या म्हाकवे गावात 'लव्ह जिहाद'च्या आरोपावरून निर्माण झालेला तणाव कसा निवळला? आंदोलनानंतर तरुणी पालकांच्या स्वाधीन झाली असली तरी गावकरी आता कोणत्या कठोर कारवाईची मागणी करत आहेत? जाणून घ्या या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम.

कोल्हापूरमधील कागल पोलीस ठाण्यासमोर म्हाकवे गावातील ग्रामस्थ आणि उपस्थित नागरिक आंदोलन करत असतानाचे दृश्य.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील म्हाकवे गावात एका सज्ञान तरुणीच्या आंतरधर्मीय संबंधांच्या प्रकरणावरून शनिवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाला काही ग्रामस्थांनी 'लव्ह जिहाद'चे स्वरूप असल्याचा आरोप केला. शेकडो महिला आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि तरुणीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. ग्रामस्थांचे निवेदन ऐकून मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित जाधव यांच्याशी संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले.
पोलीस ठाण्यात तरुणी आणि तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करत हा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवण्यावर भर दिला. अखेर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले, त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात युवा नेते नाविद मुश्रीफ, शिवसेना (उबाठा)चे विजय देवणे, अंबरीश घाटगे आणि वीरेंद्र मंडलिक यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद माळी, माजी पंचायत समिती सदस्य ए. वाय. पाटील आणि माजी सरपंच वर्षा पाटील हे देखील उपस्थित होते.
या प्रकरणावर माहिती देताना डीवायएसपी आप्पासाहेब पवार यांनी सांगितले की, गुरुवारी संबंधित सज्ञान तरुणी आणि तिचा मित्र वकिलांसह पोलीस ठाण्यात आले होते आणि त्यांनी एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तरुणीचे समुपदेशन करून तिला कोल्हापूर येथील निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. पालकांच्या विनंतीनंतर पुन्हा समुपदेशन केल्यावर तिने पालकांसोबत जाण्याची तयारी दर्शविल्याने तिचा ताबा त्यांना देण्यात आला. भविष्यात तरुणीकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विजय देवणे यांनी संबंधित तरुणावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला तडीपार करण्याची मागणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद माळी यांनी या प्रकरणात सर्व राजकीय गट एकत्र असल्याचे नमूद केले, तर माजी सरपंच वर्षा पाटील यांनी तरुणाच्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली.

Vijay Morbale, Kolhapur
पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)
शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा
परिचय:
विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।
कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:
विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।
पत्रकारिता का दृष्टिकोण:
सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।
ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।
