कोल्हापूर जिल्ह्यातील कोगील बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशी व वारीचे औचित्य साधत "फुले समृद्ध ग्राम" उपक्रमांतर्गत ग्रंथ दिंडी आणि अनोख्या शेतकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. भक्ती, संस्कार आणि शेतीचे महत्त्व यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या दिंडीने संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. विजय मोरबाळे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दिंडीत शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका तसेच कृषीकन्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

हरीनामाच्या गजरात निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी शेतीविषयक जनजागृती करणारे संदेश देत ग्रामस्थांना कृषी संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. जय जवान जय किसान, माती म्हणजे माता आणि माऊली म्हणजे गाथा अशा प्रभावी घोषवाक्यांचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. लहान मुलांच्या माध्यमातून शेतीचे महत्त्व, अन्नदात्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी बनले.

शाळेपासून प्रारंभ झालेली ही दिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून पदयात्रा करत श्री हनुमान मंदिर, कोगील बुद्रुक येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. दिंडीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केले. या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका मेहरुनिस्सा मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक अंकुश माने, श्रीधर बुधले, सुरेखा पुजारी, सीमा आवटे, विनोद पाटील व खोत मॅडम यांनी केले.

तसेच रावे समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे व कार्यक्रम अधिकारी डॉ. मयुरी खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या ऋषिका माने, गौरी खाटपे, प्रांजल मांजरे, प्राजक्ता पाटील, संध्या पेटकर आणि पूजा नाळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. भक्ती, वाचन संस्कृती आणि शेतीविषयक जनजागृती यांचा अनोखा मिलाफ घडवून आणणाऱ्या या शेतकरी दिंडीचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आदर, सामाजिक जाणीव आणि संस्कार रुजविणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

Vijay Morbale, Kolhapur

Vijay Morbale, Kolhapur

पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)

शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा

परिचय:

विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।

कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:

विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।

पत्रकारिता का दृष्टिकोण:

सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।

ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।

Next Story