कोल्हापूर: जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त (११ जुलै) कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या भूगोल विभागामार्फत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लोकसंख्या वाढ, तिचे परिणाम, लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता आणि लोकसंख्या संक्रमण सिद्धांत या विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये विशेष जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी लोकसंख्या वाढ, तिचे सामाजिक-आर्थिक परिणाम, नियंत्रणाची गरज आणि भारताची सध्याची लोकसंख्या स्थिती यावर आधारित माहितीपूर्ण भित्तिपत्रिका सादर केल्या. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार भारत सध्या तिसऱ्या टप्प्यात असून, लोकसंख्या स्थिर होण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या उपक्रमात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य उदयकुमार शिंदे यांनी सांगितले की, जगाची लोकसंख्या ८०० कोटींचा टप्पा पार करून पुढील काही वर्षांत आणखी वाढणार आहे. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आतापासूनच नियोजनबद्ध निर्णय घेणे आवश्यक आहे. देशाचे भविष्य असलेल्या युवकांमध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक जबाबदारीबाबत सजगता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संजय देसाई, मौनी विद्यापीठ कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगुले, बीएबीडी समन्वयक श्रीमती शारदा पाटील, सहसमन्वयक डॉ. राम मेढेकर, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. गौतमी कांबळे यांनी पार पाडले, तर आभार प्रा. विक्रम राऊत यांनी मानले. लोकसंख्या वाढीच्या आव्हानांवर युवकांना सजग करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश पूर्ण झाला.

Vijay Morbale, Kolhapur

Vijay Morbale, Kolhapur

पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)

शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा

परिचय:

विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।

कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:

विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।

पत्रकारिता का दृष्टिकोण:

सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।

ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।

Next Story