जालना: जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाचे स्पष्ट आदेश आणि 'जैसे थे' (Status Quo) स्थितीचे निर्देश पायदळी तुडवत, संग्राम नगर भागातील एका चहाच्या दुकानावर अतिक्रमण विभागाने केलेली तोडफोड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात आता वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष हरिष आंबादास रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, बस स्टँड रोड परिसरातील संग्राम नगर येथील शेख महेबूब शेख रशीद कुरेशी यांच्या चहाच्या दुकानावर प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता ही कारवाई केली. विशेष म्हणजे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि न्यायालयाने जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही मनपाच्या अतिक्रमण विभागाने दुकानाचे बांधकाम तोडले. दुकानदाराने मालमत्ता कर भरल्याच्या अधिकृत पावत्या दाखवूनही कर्मचाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित दुकानदाराने केला आहे.

या मनमानी कारभारामुळे दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, नुकसानग्रस्त दुकान मालकाला योग्य नुकसानभरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आघाडीने दिला आहे. यावेळी शेख महेबूब शेख रशीद कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख, समीर शेख आणि आर्यन चौधरी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. प्रशासनाच्या या कारवाईमुळे आता जालना महानगरपालिकेत खळबळ उडाली असून, न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

Rahul Mule, Jalna(Maharashtra)

Rahul Mule, Jalna(Maharashtra)

नाम: राहुल सुरेश मुळे

पद: संवाददाता (प्रातकाल)

निवास स्थान: गीताई मधुबन कॉलोनी, जालना शहर

कार्यक्षेत्र: जालना (महाराष्ट्र)

बीट (मुख्य विषय): राजनीति, क्राइम (अपराध), और प्रशासन (जालना शहर)

परिचय

राहुल सुरेश मुळे महाराष्ट्र के जालना क्षेत्र के एक बेहद अनुभवी और वरिष्ठ पत्रकार हैं। वह जालना शहर की गीताई मधुबन कॉलोनी के निवासी हैं और पिछले 15 वर्षों से जालना शहर व आसपास के क्षेत्रों में पत्रकारिता के क्षेत्र में निरंतर सक्रिय हैं। वर्तमान में वह 'प्रातकाल' के संवाददाता के रूप में अपनी सेवाएं दे रहे हैं। राहुल जी मुख्य रूप से जालना शहर की राजनीति, आपराधिक मामलों (क्राइम) और प्रशासनिक गतिविधियों से जुड़ी खबरों पर पैनी नजर रखते हैं और उन्हें पूरी निष्पक्षता के साथ पाठकों तक पहुंचाते हैं।

पत्रकारिता का अनुभव 

डेढ़ दशक (15 वर्ष) के अपने लंबे पत्रकारिता सफर में राहुल सुरेश मुळे जी ने कई प्रतिष्ठित मीडिया संस्थानों के साथ काम किया है। 'प्रातकाल' से जुड़ने से पहले उन्हें निम्नलिखित समाचार पत्रों और मीडिया प्लेटफॉर्म्स पर ग्राउंड रिपोर्टिंग का एक व्यापक और समृद्ध अनुभव रहा है:

  • दैनिक आनंद नगरी
  • बदलता महाराष्ट्र
  • दिव्यांग वार्ता

शैक्षणिक योग्यता (Education)

उन्होंने अपनी माध्यमिक शिक्षा (12वीं) पूरी की है। उनका जमीनी स्तर का लंबा अनुभव और जालना शहर की भौगोलिक व राजनीतिक परिस्थितियों पर मजबूत पकड़ ही उनकी सबसे बड़ी ताकत है।

Next Story