जालना: अंबड रोडवर भटक्या कुत्र्यांचा हैदोस, तरुणावर जीवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये तीव्र संताप
जालना शहरातील अंबड रोडवर भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरू असून तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीचा मृत्यू होऊनही महापालिका प्रशासन गप्प का? नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संताप व्यक्त होत आहे.

तस्वीर में अंबड रोड स्थित एक दुकान के बाहर एक युवक पर कुत्ता हमला करता दिख रहा है।
जालना शहरातील अंबड रोड परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संतप्त नागरिकांनी जालना महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले आहेत. बुधवारी सकाळी १० वाजता प्राप्त माहितीनुसार, अंबड रोडवरील नरेश कॉम्प्लेक्स परिसरात स्कूटरवरून जाणाऱ्या एका तरुणावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. तरुणाने स्वतःची सुटका करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र कुत्र्याने त्याला सोडले नाही. अखेर स्थानिक नागरिकांनी धाव घेत तरुणाची सुटका केली.
परिसरात रेबीजची लक्षणे असलेले आणि जखमी कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही महिन्यांपूर्वीच याच परिसरात एका चिमुकलीचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या भीषण घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही सुधारणा केली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते नरेश अवघड यांनी संतप्त सवाल उपस्थित केला असून, आणखी किती निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, अशी विचारणा केली आहे. या भागातील नागरिक आता कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने पकड मोहीम राबवण्याची मागणी करत आहेत. जर संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना केल्या नाहीत आणि भविष्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात जीवितहानी किंवा नागरिक जखमी झाल्यास, त्यास संबंधित विभागप्रमुख आणि कुत्र्यांचे पकड व पुनर्वसन करणाऱ्या संस्थेला जबाबदार धरून त्या संस्थेला काळ्या यादीत टाकावे, अशी आक्रमक मागणीही नागरिकांनी केली आहे.

Achut D. More(Jalna)
Achut D. More (Jalna) प्रातःकाल न्यूज़ के अनुभवी रिपोर्टर हैं, जो जलना क्षेत्र से ताज़ा और भरोसेमंद समाचार लाने में माहिर हैं। उन्होंने सामाजिक, राजनीतिक और स्थानीय घटनाओं पर अपनी गहरी समझ और निष्पक्ष दृष्टिकोण के साथ कई महत्वपूर्ण रिपोर्टिंग की हैं। उनकी रिपोर्टिंग का उद्देश्य पाठकों तक सत्य और तथ्यपूर्ण जानकारी पहुँचाना है, जिससे लोग हर खबर को समझदारी और विश्वास के साथ ग्रहण कर सकें।
