कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ऑनलाइन Google Quiz चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी दि. ११ जुलै रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. उदयकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या दालनात पार पडले. तरुणांमध्ये लोकसंख्या, आरोग्य व पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे विशेष पाऊल उचलण्यात आले आहे.

यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनासाठी "Realizing the hopes and aspirations of young people – today and for the future" म्हणजेच आज आणि भविष्यासाठी तरुणांच्या आशा व आकांक्षा साकार करणे, ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. याच संकल्पनेच्या आधारावर लोकसंख्या संतुलन, कुटुंब कल्याण आणि शाश्वत विकासाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या Quiz चे आयोजन केले होते.

उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रो. डॉ. उदयकुमार शिंदे म्हणाले की, लोकसंख्या ही जरी राष्ट्राची मोठी शक्ती असली, तरी तिचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करणे ही काळाची गरज आहे. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, नैसर्गिक संसाधनांवरील ताण, पर्यावरणीय समस्या आणि शाश्वत विकासाची आव्हाने लक्षात घेता, प्रत्येक नागरिकाने लोकसंख्याविषयक जागरूक राहणे आवश्यक आहे. त्यांनी तरुणांना आवाहन केले की, लोकसंख्या, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यांचा परस्परसंबंध समजून घेऊन त्यांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी. तसेच, अशा ऑनलाइन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धी, स्पर्धात्मक वृत्ती आणि संशोधनाची आवड निर्माण होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. ए. एम. प्रधान यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी या ऑनलाइन Google Quiz चा मुख्य उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. एस. बी. देसाई, स्टाफ प्रतिनिधी डॉ. शहाजीराव वारके, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. जितकर, बी.ए.-बी.एड. विभाग समन्वयक शारदा पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ. ए. बी. कांबळे, डॉ. पी. पी. डांगे, प्रा. अतिश चव्हाण आणि रणजीत आबिटकर आदी मान्यवर उपस्थित होते. जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून राबवलेला हा उपक्रम जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Vijay Morbale, Kolhapur

Vijay Morbale, Kolhapur

पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)

शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा

परिचय:

विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।

कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:

विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।

पत्रकारिता का दृष्टिकोण:

सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।

ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।

Next Story