कोल्हापूर : विजय मोरबाळे श्री मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे कला, विज्ञान, वाणिज्य व शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी येथील रसायनशास्त्र विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि स्प्रिंगवेल फार्मा प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनशास्त्र विषयात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावरील ऑनलाइन आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला भारतासह विविध देशांतील प्राध्यापक, संशोधक, संशोधन विद्यार्थी तसेच पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा रसायनशास्त्रातील संशोधन, औषधनिर्मिती, मॉलिक्युलर मॉडेलिंग, संगणकीय रसायनशास्त्र, डेटा विश्लेषण, संशोधन लेखन, साहित्य सर्वेक्षण तसेच नाविन्यपूर्ण संशोधनासाठी होणारा प्रभावी वापर याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने संशोधनाची गुणवत्ता, गती आणि अचूकता कशी वाढविता येते, तसेच आधुनिक संशोधनात विविध कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला. कार्यशाळेच्या दोन तांत्रिक सत्रांमध्ये मान्यवर संसाधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात डॉ. बंडू चटाले यांनी संशोधन लेखन, साहित्य सर्वेक्षण, संदर्भ व्यवस्थापन, डेटा विश्लेषण, वैज्ञानिक आकृत्या व सादरीकरण निर्मितीसाठी उपयुक्त आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने, नैतिकतेचे पालन करून आणि चिकित्सक दृष्टिकोनातून वापर करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. दुसऱ्या सत्रात डी. वाय. पाटील विद्यापीठ, स्कूल ऑफ फार्मसी, नवी मुंबई येथील प्राध्यापक डॉ. हरीश कुंदैकर यांनी संशोधन नियोजन, डेटा व्यवस्थापन, वैज्ञानिक माहितीचे विश्लेषण, औषध शोध, नवीन संयुगांची रचना तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी व जबाबदारीने वापर याबाबत मार्गदर्शन केले. दोन्ही सत्रांमध्ये सहभागींच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. डॉ. यू. आर. शिंदे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ भविष्यातील तंत्रज्ञान नसून आजच्या संशोधनाची अपरिहार्य गरज असल्याचे सांगितले. रसायनशास्त्रासारख्या मूलभूत विज्ञान शाखेत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संशोधनाची गुणवत्ता, वेग आणि अचूकता लक्षणीयरीत्या वाढू शकते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांनी नैतिकतेचे भान ठेवून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापर करावा आणि जागतिक दर्जाच्या संशोधनासाठी सतत अद्ययावत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एम. पाटील यांनी प्रास्ताविकात विभागामार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा, तज्ज्ञ व्याख्याने आणि कौशल्यविकास कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक संशोधनाशी जोडण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कार्यशाळेचे संयोजक प्रा. प्रवीण खराडे यांनी संसाधन व्यक्तींचा परिचय करून दिला व आभार मानले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एस. ए. व्हनाळकर, डॉ. यु. बी. चौगले, प्रा. डी. बी. मोहिते यांच्यासह रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.

Vijay Morbale, Kolhapur

Vijay Morbale, Kolhapur

पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)

शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा

परिचय:

विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।

कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:

विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।

पत्रकारिता का दृष्टिकोण:

सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।

ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।

Next Story