जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी अमेरिकेला जाणाऱ्या अमृता पुजारीला सतेज पाटील यांची ५० हजारांची मदत
मुरगूडच्या कुस्तीपटू अमृता पुजारीची २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी जाहीर केलेली ५० हजारांची मदत सुपूर्द केली.

कोल्हापूर : विजय मोरबाळे
२३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे स्वप्न घेऊन अमेरिकेला जाणाऱ्या मुरगूडच्या कुस्तीपटू अमृता पुजारी हिच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेला माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. अमृताची निवड झाल्याबद्दल जाहीर केलेली ५० हजार रुपयांची बक्षीस रक्कम त्यांनी तातडीने सुपूर्द केली.
२३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी अमृताची निवड झाल्याबद्दल ६ सप्टेंबर रोजी सतेज पाटील यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी अमृताला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जाहीर केलेली रक्कम तातडीने देत त्यांनी ‘बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले’ याची प्रचिती दिली.
मंडलिक कुस्ती संकुलात झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक राजेंद्र साबळे व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव ताशिलदार यांच्या हस्ते अमृताला बक्षीस रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी मुरगूड नगरीचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, जयसिंग भोसले, नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, दीपक शिंदे, नगरसेवक एस. व्ही. चौगुले, राजू कांबळे, अंगज मॅडम, शिंदे मॅडम आणि पत्रकार सुनील डेळेकर आदी उपस्थित होते.
तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक दादासो लवटे, NIS कुस्ती प्रशिक्षक दयानंद खतकर, महिला NIS कुस्ती प्रशिक्षक नंदिनी साळोखे आणि उपमहाराष्ट्र केसरी रोहन रंडे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दादासो लवटे म्हणाले, “सतेज उर्फ बंटी पाटील यांची ही मदत अमृताला जागतिक स्तरावर कोल्हापूरचे नाव चमकविण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल.”
अमृताच्या आंतरराष्ट्रीय मोहिमेसाठी मिळालेल्या ५० हजार रुपयांच्या या मदतीमुळे तिच्या क्रीडा प्रवासाला नवी ऊर्जा मिळाली आहे. अमेरिकेत होणाऱ्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या अमृताला यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
फोटो : मंडलिक कुस्ती संकुलात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी अमेरिकेला जाणाऱ्या अमृता पुजारीला ५० हजार रुपयांची बक्षीस रक्कम सुपूर्द करताना मान्यवर.

Vijay Morbale, Kolhapur
पद: क्षेत्रीय संवाददाता (कोल्हापुर)
शिक्षा: बी.एससी (केमिस्ट्री), ग्रामीण पत्रकारिता एवं जनसंचार में पीजी डिप्लोमा
परिचय:
विजय गुंडू मोरबाळे महाराष्ट्र के कोल्हापुर क्षेत्र के एक समर्पित और अनुभवी जमीनी पत्रकार हैं। शिवाजी विश्वविद्यालय से बी.एससी (केमिस्ट्री) की डिग्री हासिल करने के बाद, उन्होंने पत्रकारिता के प्रति अपने जुनून को करियर में बदला। उन्होंने शिवाजी विश्वविद्यालय के 'ग्रामीण पत्रकारिता और जनसंचार' कोर्स में सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय (मुरगुड) में प्रथम स्थान प्राप्त किया है, जो ग्रामीण और स्थानीय मुद्दों पर उनकी गहरी समझ को दर्शाता है।
कार्यक्षेत्र और विशेषज्ञता:
विजय मुख्य रूप से कोल्हापुर जिले के कागल, मुरगुड, अदमापुर और भुदरगड जैसे क्षेत्रों में सक्रिय हैं। 'निकाल न्यूज' जैसे प्रतिष्ठित डिजिटल प्लेटफॉर्म्स के माध्यम से स्थानीय पत्रकारिता में अपनी पहचान बनाने के बाद, अब वे 'प्रातःकाल' (pratahkal.in) के डिजिटल नेटवर्क से जुड़े हैं। वे स्थानीय राजनीति, सामाजिक सरोकार, अपराध (क्राइम) और क्षेत्र के ऐतिहासिक व धार्मिक मंदिरों से जुड़ी महत्वपूर्ण खबरों को सटीकता से जनता तक पहुँचाते हैं।
पत्रकारिता का दृष्टिकोण:
सकारात्मक और समाजोपयोगी पत्रकारिता में गहरा विश्वास रखने वाले विजय हमेशा उन खबरों को प्राथमिकता देते हैं जो समाज में बदलाव ला सकें। हाल ही में जून 2026 में, एक सेवानिवृत्ति समारोह में हार-फूलों की जगह अनाज इकट्ठा कर जरूरतमंदों को बांटने की एक अनूठी सामाजिक पहल को उन्होंने प्रमुखता से कवर किया था, जिसे काफी सराहना मिली।
ग्रामीण भारत की आवाज और स्थानीय विकास की खबरों को डिजिटल माध्यमों पर मजबूती से रखने के लिए विजय मोरबाळे लगातार प्रयासरत हैं।
