सोलापुर रेलवे विभाग ने महिला यात्री की खोई हुई सोने की चेन लौटाई
हासन-सोलापुर एक्सप्रेस के बायो-टॉयलेट में गिरी सोने की चेन को यांत्रिक विभाग और आरपीएफ ने त्वरित कार्रवाई कर सुरक्षित बाहर निकाला।

सोलापुर स्टेशन पर ६ फरवरी २०२६ को रेलवे सुरक्षा बल और यांत्रिक विभाग के कर्मचारियों ने सफलतापूर्वक अभियान चलाकर यात्री को उसकी खोई हुई संपत्ति सौंपी।
सोलापूर विभागाच्या तत्पर कारवाईमुळे हरवलेली सोन्याची साखळी परत मिळाली
मध्य रेल्वेच्या, सोलापूर विभागाने जलद आणि समन्वित कारवाईद्वारे प्रवासी सेवेप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, ज्यामुळे एका महिला प्रवाशाने ट्रेन प्रवासादरम्यान गमावलेली सोन्याची साखळी यशस्वीरित्या परत मिळवण्यात आली.
घटनेचा तपशील आणि तक्रार
- प्रवासी ट्रेन क्रमांक ११३१२ (हासन-सोलापूर एक्सप्रेस) मधून प्रवास करत असताना, प्रवासादरम्यान चुकून सोन्याची साखळी शौचालयाच्या कमोडमध्ये पडली.
- गाडीतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रयत्न करूनही, ती वस्तू सापडली नाही.
- संबंधित प्रकरणात ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे 'रेल मदत' पोर्टलद्वारे रेल्वेकडे मदतीसाठी तात्काळ तक्रार नोंदवण्यात आली.
रेल्वे प्रशासनाची यशस्वी शोध मोहीम
सदरची ट्रेन सोलापूर स्थानकावर पोहोचल्यावर, सोलापूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली. प्रवाशाला समजावून सांगून धीर देण्यात आला, त्यानंतर यांत्रिक विभागाच्या कॅरेज आणि वॅगन शाखेच्या बायो-टॉयलेट देखभाल पथकाने, कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने, बायो-टॉयलेटच्या टाकीतून सोन्याची साखळी काळजीपूर्वक बाहेर काढली.
साखळी सुपूर्द आणि प्रवाशाची प्रतिक्रिया
त्यानंतर, ती सापडलेली वस्तू आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे प्रवाशाच्या ताब्यात देण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल आणि समर्थनाबद्दल प्रवाशाने समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली. सोलापूर विभाग हा प्रवाशांची सुरक्षा, तक्रारींचे त्वरित निवारण आणि सर्वकाळ सहानुभूतीपूर्ण सेवा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.
दिनांक: ६ फेब्रुवारी २०२६
प्रसिद्धी पत्रक क्रमांक: SUR/2026/02/02
"हे प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, सोलापूर विभाग, मध्य रेल्वेद्वारे जारी करण्यात आली आहे."

Pratahkal Newsroom
प्रातःकाल न्यूज़-रूम, प्रातःकाल न्यूज़ की वह समर्पित संपादकीय टीम है, जो सटीक, समयबद्ध और निष्पक्ष समाचार पहुँचाने के लिए प्रतिबद्ध है। हमारा न्यूज़-रूम राजनीति, समाज, अर्थव्यवस्था और राष्ट्रीय मामलों में सत्यापित रिपोर्टिंग, गहन विश्लेषण और जिम्मेदार पत्रकारिता पर अपना ध्यान केंद्रित करता है।
