कृत्रिम बुद्धिमत्ता: भविष्याची नवी दिशा आणि करिअरच्या अमर्याद संधी
- अशिती जोईल. २०२५ हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्रांतीसाठी ओळखले जात आहे. ‘टेक्नोलॉजिया’ या सदराच्या माध्यमातून आपण AI क्षेत्रातील विविध पैलूंचा वेध घेत आहोत. या आठवड्यात आपण जाणून घेतले आहे की, एआयमुळे नोकऱ्यांमध्ये काय बदल होत आहेत आणि या नव्य
_202508011635467233.jpg)
_202508011635467233.jpg)
- अशिती जोईल.
_202508011639232397.jpg)
_202508011644001023.jpg)
परंतु, या बदलाकडे केवळ नकारात्मक दृष्टीने पाहणे म्हणजे संधी गमावण्यासारखे आहे. त्यामुळे आपण एखादी संधी गमावण्यापेक्षा त्या संधीचे सोने कसे करता येईल याकडे पाहणे गरजेचे आहे. जर आपण इतिहासात डोकावले तर आपल्या लक्षात येईल, की औद्योगिक क्रांतीनंतर अनेक पारंपरिक रोजगार गेले, पण त्याच वेळी अगणित नव्या संधी आणि व्यवसाय निर्माण झाले आहेत. आताचा काळही तसाच आहे. किंबहुना, एआयच्या बाबतीतही तेच घडत आहे. जे व्यवसाय एआयचा स्वीकार करणार नाहीत, ते काळाच्या ओघात मागे पडतील आणि जे एआयचा कल्पकतेने वापर करतील, ते नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील,यात शंकाच नाही. त्यामुळे नोकऱ्या जाण्याऐवजी त्यांचे फक्त स्वरूप बदलेल आणि नव्या करिअरची दालने उघडतील. आता तुम्हांला प्रश्न पडलाच असेल, की या एआय आधारित नवीन करिअर संधी नेमक्या कोणत्या? त्यांचे स्वरूप तरी काय? ते आपण पुढे पाहूयात.
_202508011651470598.jpg)

