काळोखापलीकडचं सौंदर्य ;
- विनश्री राणे
भयंकर काळोख, त्यात चाचपडत चाचपडत पडणारी पावलं, लांब कुठून तरी येणार प्रकाशाचा किरण..आणि अचानक अंधारा रस्ता संपतो.. लख्ख प्रकाशात एक सुंदर, निळशार तळं तुमच्या नजरेस पडत. नाही! हे कोणतही स्वप्न नाहीय. हा आहे caving करणाऱ्यांचा अनुभव..
आपल्या रोजच्या आयुष्यातील दगदगीतून जरा उसंत मिळावी म्हणून माणूस नेहमीच स्वतःसाठी करमणुकीची साधनंआणि वेगवेगळे पर्याय शोधत आलाय मग ते खेळ असो वा भटकंती.. आज आपण अशाच एका साहसी पर्यटन प्रकाराची ओळख करून घेणार आहोत, ज्यामध्ये काळोख, गूढता आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम आहे. होय, आपण बोलत आहोत ते Caving Tourism बद्दल गुहांमधील प्रवास म्हणजे केवळ साहस नाही, तर स्वतःला नव्याने शोधण्याचा एक अनोखा अनुभवच आहे .

  काळोखापलिकडची रोषणाई..
भारतामध्येही आता या साहसी पर्यटनाला वाढती मागणी आहे आणि अनेक तरुण-तरुणी या प्रवासात आपली धाडसाची खरी परीक्षा पाहत आहेत. मग चला, जाणून घेऊया, गुहांच्या गूढ जगतातील हा थरारक प्रवास आणि त्यामागील आकर्षण नेमकं काय आहे...
मानवाने निसर्गाचा शोध घेण्याची आणि त्याच्यातील रहस्यं उलगडण्याची इच्छा अनादी काळापासून जोपासली आहे. पूर्वी संरक्षणासाठी आणि निवासासाठी वापरली गेलेली गुहा, आजच्या काळात साहसप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र बनली आहे. हीच गुहा, जी कधीकाळी भीतीची जागा वाटायची, आज जिज्ञासु आणि धाडसी मनांसाठी अनोख्या अनुभवांचं दार उघडते आहे.

  काळोखापलिकडची रोषणाई..
Caving, ज्याला "स्पेलिओलॉजी" असंही म्हणतात, ही केवळ गुहांमध्ये फिरण्याची क्रिया नाही, तर ती काळोख, शांतता आणि निसर्गातील गूढतेचा शोध घेण्याची एक साहसी सफर आहे. गुहेच्या अंधाऱ्या वाटांवरून मार्ग शोधताना मनात उत्सुकतेसोबत भीतीही असते. पण या अनुभवातून माणूस स्वतःच्या आतल्या धैर्याला आणि संयमाला ओळखतो.
भारतामध्ये सध्या Caving Tourism हळूहळू लोकप्रिय होत आहे. विशेषतः मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत, कर्नाटकमधील बदामी, आणि मध्यप्रदेशातील भीमबेटका अशा ठिकाणी असंख्य प्राचीन आणि नैसर्गिक गुहा आहेत. या गुहांमध्ये काही ठिकाणी पाण्याची सरोवरे, stalactites आणि stalagmites सारखी निसर्गनिर्मित शिल्पं, तसेच आदिमानवांच्या चित्रांनी सजलेल्या भिंती सापडतात.

  काळोखापलिकडची रोषणाई..
परंतु, Caving करताना योग्य तयारी आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. चांगली प्रकाशयंत्रणा (टॉर्च), हेल्मेट, मजबूत बूट, आणि योग्य कपडे घालणं आवश्यक आहे. अनुभवी मार्गदर्शकाची साथ हवीच. हवामानाची माहिती घेऊन, योग्य नियोजन करूनच हा प्रवास करावा. कारण गुहेतील पाण्याचा प्रवाह, अरुंद वाटा आणि गुळगुळीत दगड या गोष्टी धोकादायक ठरू शकतात.

  काळोखापलिकडची रोषणाई..
गुहेच्या काळोखातून बाहेर पडताना डोळ्यांपुढे उघडणारा निसर्गाचा देखावा केवळ डोळ्यांना नव्हे तर मनालाही सुखावणारा असतो. ही केवळ एक साहसयात्रा नसून, स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा आणि जीवनातल्या अडचणींना सामोरं जाण्याचं शिकवण देणारा अनुभव असतो.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अशा अनोख्या साहसामुळे मनाला नवी ऊर्जा मिळते, आणि निसर्गाशी पुन्हा एकदा नातं जुळतं. काय मग कधी निघताय Daring ने Discovery करायला?
Editorial

Editorial

Next Story