✕
कृत्रिम बुद्धिमत्ता : शिक्षण क्षेत्रातील नव्या युगाची सुरुवात
By EditorialPublished on
आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) हे केवळ तंत्रज्ञानाचे साधन राहिलेले नाही, तर मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. विशेषतः मोठी भाषा प्रारूपे (Large Language Models - LLMs) जसे की GPT, BERT यांसारखी प्रणाली, शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला नवे आयाम देत आहेत. यामुळे शिक्षण अधिक सुलभ, वैयक्तिक आणि संवादात्मक झाले आहे. पण जसे प्रत्येक तंत्रज्ञानाकडे संधींच्या दृष्टीने पाहिले जाते, तसंच काही धोके आणि मर्यादाही त्यात असतात. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक दुधारी तलवार आहे –

x

- अशिती जोईल.
मागच्या भागात आपण AI (Artificial Intelligence) म्हणजे नेमकं काय हे जाणून घेतलं. त्याचे कार्य काय काय आहेत ? या बद्धल थोडक्यात आपण आधी पाहिलंच. आता आपण या बद्धलची अधिक आणि सखोल माहिती समजून घेऊयात. आज आपण AI ची भाषा प्रारूपे म्हणजे नेमकं काय? त्याचा कसा वापर केला जातो ? यासारख्या अनेक प्रश्नची उत्तर समजून घेऊयात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अलीकडील अद्ययावत आणि विकसित आवृत्तीमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षा लक्षणीय स्वरुपात रुंदावल्या गेल्या आहेत. पण असे असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे एक दुधारी तलवार म्हणून आपण पाहू शकतो. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचे जसे माहितीचे स्वयंचलन, भाषा कौशल्य, अचूकता तसेच परिपूर्ण कार्यक्षमतेसारखे अनेक फायदे आहेत त्याबरोबरच तिचे व्यावसायिक नैतिकता, नोकरीचे विस्थापन, पूर्वाग्रह आणि सुरक्षा-भेद्यता यांसारखे संभाव्य तोटे देखील आहेत.
सदर लेखाद्वारे आपण सध्या चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता भाषा प्रारूप/साधन ज्याला मोठे भाषा प्रारूप (एलएलएम) असे देखील म्हटले जाते, या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रामध्ये एक संधी म्हणून कशाप्रकारे प्रभाव पडला आहे आणि त्याचे या क्षेत्रातील संभाव्य दुष्परिणाम यांबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक सर्वसमावेशक, परिणामकारक आणि संवादात्मक बनू शकते. AI च्या मदतीने शिक्षण वैयक्तिक पद्धतीने, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार दिलं जाऊ शकतं. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उदाहरणांमधून, चित्रं किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जास्त चांगल्या प्रकारे समजावून सांगता येतं.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकाच्या साहाय्याने कृत्रिम पद्धतीने विकसित केलेली बौद्धिक क्षमता आहे. ही एक विज्ञानावर आधारित शाखा असून, संगणकशास्त्राच्या ठरावीक दिशा-निर्देशांचा उपयोग करून संगणक किंवा रोबोटिक प्रणाली निर्माण केली जाते, जी मानवी मेंदूप्रमाणे तर्कशुद्ध विचार करू शकते. AI चे जनक जॉन मॅकार्थी यांच्या मते, "कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमान यंत्र, विशेषतः बुद्धिमान संगणक प्रोग्रॅम तयार करण्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान होय."

कृत्रिम भाषा प्रारूपे/ साधने (Language Models) ही नैसर्गिक भाषा प्रक्रिया (Natural Language Processing - NLP) या उपशाखेचा भाग आहेत. हि भाषिक साधने संगणकांना मानवी भाषा समजण्यास, तिचे विश्लेषण करण्यास आणि मानवी भाषेचे निर्मिती करण्यास सक्षम करतात. NLP अंतर्गत विकसित अल्गोरिदम आणि भाषांतर, संवाद, आवाज ओळख आणि इतर भाषिक व्यवहारांमध्ये समर्थपणे वापरली जातात. या प्रारूपांचा वापर GPT, BERT, T5 यांसारख्या माध्यमातून केला जातो.
शिक्षण क्षेत्रात AI चा वापर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रभावी ठरतो. AI च्या मदतीने शिक्षणात खूप सुधारणा करता येते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीनुसार शिकता येते, त्याच्या गरजेनुसार माहिती मिळते. ज्या गोष्टी समजायला कठीण असतात त्या सोप्या भाषेत किंवा उदाहरणांद्वारे समजावून सांगता येतात. तसेच चित्र, व्हिडिओ यांचा उपयोग करून शिकणे अधिक रंजक आणि प्रभावी होते. AI आभासी शिक्षकासारखे काम करते, जे विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन देते आणि त्यांच्या प्रगतीचा मागोवा ठेवते.

या प्रणालींच्या सहाय्याने शैक्षणिक संसाधनांचा शोध घेता येतो आणि त्यांची उपलब्धता वाढवता येते. विविध डिजिटल स्रोत, शैक्षणिक निबंध, पुस्तके, संशोधन लेख, आणि अन्य शैक्षणिक साहित्य शोधता येते. त्यामुळे भौगोलिक किंवा आर्थिक अडथळ्यांवर मात करता येते आणि विद्यार्थ्यांना किंवा संशोधकांना अद्ययावत माहिती सहजपणे प्राप्त होते. विविध विषयांवरील संशोधनात्मक दृष्टीकोन, तुलनात्मक विश्लेषण आणि आंतरशाखीय दृष्टीकोन मिळवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरते.
शिक्षणासाठी लागणारी माहिती शोधण्यासाठीही AI उपयोगी पडते. वेगवेगळ्या शैक्षणिक वेबसाइट्स, निबंध, संशोधन लेख यांचा शोध घेता येतो आणि त्या माध्यमातून नवीन ज्ञान मिळवता येते. त्यामुळे केवळ शाळा किंवा कॉलेजपुरतं शिक्षण मर्यादित राहत नाही, तर कुठूनही आणि केव्हाही शिकता येते. त्यामुळे आर्थिक किंवा भौगोलिक अडथळे दूर होतात आणि शिक्षण सर्वांसाठी खुले होते. AI आधारित भाषासाधनांमुळे भाषा शिकणेही सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांना व्याकरण, शब्दसंग्रह सुधारण्यासाठी मदत मिळते. संभाषण सराव करता येतो आणि चुकीचे उच्चार किंवा वाक्यरचना सुधारता येते. यामुळे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये संवाद सुलभ होतो आणि जागतिक स्तरावर सहकार्य वाढते.

परंतु AI चा वापर करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. AI च्या शिक्षणासाठी वापरलेला डेटा जर चुकीचा किंवा एकांगी असेल तर त्याचे परिणामही तसंच चुकीचे असू शकतात. काही वेळा AI चे उत्तर पूर्वग्रहपूर्ण (biased) असू शकते. विद्यार्थ्यांनी AI वर जास्त अवलंबून राहू नये कारण त्यामुळे त्यांची स्वतः विचार करण्याची, समस्या सोडवण्याची सवय कमी होऊ शकते. तसेच गोपनीयता आणि सुरक्षिततेचे प्रश्नही गंभीर आहेत. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य धोरणे आणि कायदे पाळणे गरजेचे आहे.

शिक्षण क्षेत्रात AI भाषा प्रारूपांचा योग्य वापर केल्यास शिक्षण सर्वांसाठी अधिक सुलभ, सोपे आणि दर्जेदार होऊ शकते. पण याचा वापर करताना विवेक, नैतिकता आणि जबाबदारीने विचार करणे गरजेचे आहे. शिक्षक, पालक, शाळा आणि तंत्रज्ञान बनवणारे यांनी मिळून याचा संतुलित आणि सकारात्मक वापर केला पाहिजे. अशा प्रकारे AI हे शिक्षणात मोठा बदल घडवू शकते आणि शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवू शकते.

Editorial
Next Story
Related News
X
