- विनश्री राणे
"आज मैं ऊपर, आसमा नीचे..." हे गाणं आपण सगळ्यांनीच अनेकदा ऐकलं आहे, पण या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येतो तो skydiving करतानाच. हो खरंच! जमिनीपासून हजारो फूट उंचीवर, निळ्या आकाशात, शुभ्र कापसासारखे दिसणाऱ्या ढगांच्या वर जाताना, अक्षरशः या गाण्याची आठवण येते. अलीकडे उपलब्ध असलेल्या अनेक साहसी खेळांपैकी हा एक जबरदस्त अनुभव असलेला खेळ आहे. आधी विमानाने साधारण १० ते १३ हजार फूट उंचीवर जायचं, आणि मग तिथून देवाचं नाव घेत खाली उडी मारायची – म्हणजे खरंतर भीती, उत्साह, थरार यांनी हृदय थांबेल की काय, असं वाटायला लावणारा क्षण!
पण "रिस्क में ही इश्क है" असं म्हणणाऱ्या तरुणाईला हा खेळ सध्या भलताच आवडतो आहे. ते skydiving centres ला भेटी देऊन स्वतः हा अनुभव घेतातच, पण व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून आपला हा थरारक अनुभव इतरांशी शेअर करतानाही दिसतात.

काही दिवसांपूर्वी, "हा खेळ तरुणांना इतका का आवडतो?" असा विचार करत असताना, माझ्या लक्षात आलं की ही उडी फक्त आकाशात मारलेली नसते – तर ती स्वतःच्या भीतीपलीकडे, क्षमतेपलीकडे मारलेली असते. ही उडी नव्या जोशाने भरलेल्या या मंडळींना नवा अनुभव देते आणि "मी हेही करू शकतो" हा आत्मविश्वास देऊन जाते.
हे सगळं वाचल्यानतर तुम्हीही मनाने 13000 फुट वर निळ्याशार आकाशात, ढगांमधून उडी घेण्यासाठी पोचला असाल ना? पण जरा थांबा.. हा अनुभव घेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेच आहे. त्या काही गोष्टी नेमक्या काय बर आहेत ते आता पाहुयात .

  • शारीरिक क्षमता – skydiving करण्यासाठी वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं आहे.
  • सुरक्षा – केवळ सरकारमान्य, अनुभवी Skydiving Centreची निवड करावी.
  • संपूर्ण उपकरणांची आणि पॅराशूटची तपासणी आवश्यक आहे. सुरुवातीला Tandem Jump (प्रशिक्षकासोबत उडी) करणं अधिक सुरक्षित आणि मार्गदर्शक ठरतं.
  • मानसिक तयारी – साहसी खेळांमध्ये मानसिक तयारी महत्वाची ठरते. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खंबीर असाल, तर हा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरणार हे नक्की!

सध्या भारतात विविध ठिकाणी Skydiving Centres उपलब्ध आहेत ती ठिकाण नेमकी कोणती आहेत ते पाहुयात . जसे की मैसूर, डेहराडून, पाँडिचेरी इत्यादी.. जिथे तुम्ही हा अनुभव घेऊ शकता. हा फक्त खेळ नाही, तर स्वतःला स्वतःच घालून दिलेल्या बंधनांना तोडण्याची एक संधी आहे. जी आपल्याला नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि दृष्टिकोन देऊन जाते. काय मग, तयार आहात ना आकाशाच्या मैदानात ढगांबरोबर लपंडाव खेळायला?
हे ही वाचा :
Editorial

Editorial

Next Story