✕
'शिवनेरी' एका सामर्थ्यवान युगाचा अजिंक्य साक्षीदार
By EditorialPublished on
साक्षी कुलकर्णी (७६२०१८७३७८) महाराष्ट्राची ओळख, अस्मिता म्हणून गडकोटांकडे पाहिले जाते. ‘जाऊ किल्ल्यांच्या प्रांता’ यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या गडकोटांची माहिती आणि इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाऊ किल्ल्

x
साक्षी कुलकर्णी (७६२०१८७३७८)
महाराष्ट्राची ओळख, अस्मिता म्हणून गडकोटांकडे पाहिले जाते. ‘जाऊ किल्ल्यांच्या प्रांता’ यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या गडकोटांची माहिती आणि इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाऊ किल्ल्यांच्या प्रांता भाग एकमध्ये आपण शिवनेरी या किल्ल्याची माहिती जाणून घेऊया.
जीर्णनगर अर्थात सध्याचे जुन्नर (जि. पुणे) नजीक नाणेघाटाच्या डोंगर रांगांच्या कुशीमध्ये व गर्द झाडाच्या छायेखाली “शिवनेरी” हा गिरीदुर्ग स्थापन झाला आहे. हा किल्ला विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे. शिवनेरी गडास महाराष्ट्राची अस्मिता आणि पुणे जिल्ह्याची ओळख सांगणारा असे संबोधले जाते. शिवनेरीवर शिवाई देवीचे मंदिर, बाल शिवबा व जिजाऊ यांच्या प्रतिमा, कडेलोट टोक, पाण्याचे झरे, लेण्याद्री लेण्या, सात दरवाजे( महा दरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा, शिवाई दरवाजा, मेणा दरवाजा, कुलूप दरवाजा), पाण्याचे तळे इत्यादी अनेक ठिकाणे किल्ल्यांवरती घडलेल्या इतिहासाची साक्ष देत उभे असल्याचे आपणास आज देखील पहावयाला मिळते.
काही इतिहास साहित्यानुसार शिवाई देवीच्या मंदिरावरूनच या गडास शिवनेरी असे संबोधले जाऊ लागले. या किल्लावर महाराजांचा जन्म झाल्यामुळे व शिवाई देवीचा आशीर्वादाने शहाजीराजे भोसले व जिजाऊ यांना पुत्ररत्न प्राप्त झाला. या दोन बाबींचा विचार करूनच महाराजांचे नाव देखील शिवाजी असे ठेवले गेले होते.
प्रथम जीर्णनगर हे शक राजा नहपानाची राजधानी म्हणून ओळखले जात होते. नहपाना हा क्षहरत घराण्याचा वंशज होता. नहपाना राजांनी जनतेचे रक्षण उत्तम प्रकारे केले होते म्हणूनच जनतेचे पालन करणारा उत्तम शासक असे त्यांना संबोधत होते. नंतर जीर्णनगरीवर सातवाहन कुळाचे २३ वे राजा असणारे गौतमीपुत्र सातकर्णी या वैदिक हिंदू धर्मांच्या पोषणकर्त्याचे वर्चस्व आले व सातवाहन साम्राज्याच्या विस्तारा मोठ्या प्रमाणात झाला. गौतमीपुत्र सातकर्णी साम्राज्यमध्ये जीर्णनगरमध्ये व्यापारी मार्ग सुरू झाला व जुन्नर हे दळणवळणाचे त्या कालावधीमधील महत्त्वाचे ठिकाण बनले. याच कालखंडमध्येच लेण्याद्री लेणी निर्माण झाल्या होत्या आणि त्या लेण्या आजही शिवनेरी किल्ल्याच्या परिसरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात.
कालखंड ११७० ते १३०८ मध्ये चालुक्य आणि राष्ट्रकूट यांची सत्ता प्रस्थापित झाली होती. या कालावधीत सर्वत्र वास्तुकलेस खूप महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळेच जीर्णनगरामध्ये देखील एखादी भक्कम वास्तु सकारावी असा विचार झाला आणि शिवनेरी किल्ला उभारला गेला पण हा किल्ला बहमनी साम्राज्याकडे गेला होता. जुन्नरमध्ये मात्र चालुक्य संस्कृतीचा प्रसार झाला होता. इ.स.१४७० ते १४९३ या कालावधीमध्ये निजामशाहीस आरंभ झाला होता. त्यामुळे जीर्णनगरची राजधानी अहमदनगर (अहिल्यानगर)कडे स्थलांतरित झाली होती. त्या कालखंडामध्ये शिवनेरी किल्ला निजामांच्या विळख्यात अडकला होता व तेथील लोकांना अन्याय व अत्याचाराचा सामना करावा लागला.
इ.स.१५९५ च्या सुमारास जुन्नर प्रांत व शिवनेरी किल्ला हा मालोजीराजे भोसले यांना वतनदारीमध्ये मिळाला होता. शहाजीराजे भोसले व संपूर्ण भोसले कुटुंबाने जिजाबाईंना गरोदर अवस्थेमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा विचार करत असताना शिवनेरी या किल्ल्याची निवड केली. १९ फेब्रुवारी इ.स. १६३० रोजी शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवबांचे हसणे, रडणे, रांगणे यासारख्या बाललीला शिवनेरी जणू काही मन तृप्त होई पर्यंत बघत होता व साठवून ठेवत होता पण हे सुख काही मोघलांच्या पचनी पडत नव्हते. शिवबा राजे अवघ्या २ किंवा ३ वर्षांचे होते तेव्हा मोघलांचा साम्राज्य विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत चालला होता आणि त्यांच्या या वाढत्या विस्तारामध्ये शिवनेरी किल्ला देखील मोघलाईच्या ताब्यात गेला. शिवबांची आणि शिवनेरीची ताटातूट झाली. पुढे छ. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या आणि शिवनेरी किल्ला मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यामध्ये त्यांना काही यश आले नाही. अखेरीस १७१६ साली शाहू महाराजांनी किल्ला मिळवण्याची मोहिम फत्ते केली. त्यानंतर शिवनेरी हा किल्ला हिंदूच्या साम्राज्यामध्ये समाविष्ट झाला. तिथून पुढे पेशवे कालखंडाचा श्रीगणेशा झाला. पुन्हा एकदा नव्याने तिथे हिंदूचे स्वराज्य सुखाने नांदू लागले. पेशवाईमध्ये शिवनेरीचा वापर कैद्यांना ठेवण्याकरिता जास्त प्रमाणात होत होता पण सद्यस्थितीत शिवनेरीवर ते कैदखाने आपणास सुस्थितीत पाहायला मिळत नाहीत.
१० मे १८१८ रोजी मेजर एल्ट्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला होता. काही काळ शिवनेरीवरील किल्लेदार व मेजर एल्ड्रिजनन यांच्यात लढाई झाली होती. मेजर एल्ड्रिजनने अनेक शर्तीचे प्रयत्न केले पण किल्ला काही मिळाला नाही. अखेरीस एल्ट्रिजनने किल्ला मिळवणे शक्य होत नाही हे जाणून शिवनेरी मिळवण्याचा प्रयत्न सोडून दिला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मे १९०९ मध्ये भारत सरकारने शिवनेरी किल्ल्यास महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
- 'शिवजन्मभूमी शिवनेरी जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले शहाजीराजे भोसले मेजर एल्ड्रिजनन महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मार निजामशाही नाणेघाट शिवनेरीशिवनेरी शिवजन्मभूमीShivaji Maharaj Fortपुण्यातील किल्लापुणे जिल्ह्यातील किल्लेकोकणातील किल्लेमहाराष्ट्रातील किल्लेशिवरायांचे किल्लेशिवाजी महाराजांचे किल्लेमराठी साम्राज्यातील किल्लेपुणे किल्ले

Editorial
Next Story
Related News
X
