✕
अंधत्व नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी परानुभूती फाउंडेशन द्वारे नेत्र सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, वसई-विरार विभाग आणि पालघर जिल्ह्यात नेत्र आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. आजच्या या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात माणसाचे स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यात इतर आरोग्याच्या प्रश्नांसह डोळ्यांच्या आरोग्यकडे सुद्धा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, बऱ्याचदा ते होताना दिसत नाही. नेत्र आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्त्वपूर्ण बाब असून, डोळ्यांच्या समस्यांमुळे अंधत्वाचा धोका

x
_202503311101385093.jpg)
अंधत्व नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी परानुभूती फाउंडेशन द्वारे नेत्र सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, वसई-विरार विभाग आणि पालघर जिल्ह्यात नेत्र आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. आजच्या या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात माणसाचे स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यात इतर आरोग्याच्या प्रश्नांसह डोळ्यांच्या आरोग्यकडे सुद्धा विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, बऱ्याचदा ते होताना दिसत नाही. नेत्र आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीसाठी एक महत्त्वपूर्ण बाब असून, डोळ्यांच्या समस्यांमुळे अंधत्वाचा धोका वाढू शकतो. यावर उपाय म्हणून परानुभूती फाउंडेशन आणि आयडियल क्युअर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा सीएसआर उपक्रम या दोहोंच्या संयुक्तविद्यमाने एक महत्वाकांक्षी व व्यापक असे नेत्र सेवा अभियान राबवले जात आहे.
या उपक्रमामधून गरीब, मागास व आदिवासी, दुर्गम भाग, गोरगरीब गरजू जनता यांसारख्या नागरिकांना डोळ्यांचे आजार यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अशा आदिवासी पाड्यांमध्ये या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे परानुभूती फाउंडेशनने अशा भागांमध्ये आरोग्य सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे. या विचारातूनच आरोग्य सेवे चा ध्यास घेऊन परानुभूती फाउंडेशनने नेत्र सेवा अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून वंचित आणि गरजू नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत डोळ्यांची तपासणी, औषधे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया वेळेस होऊन त्याचे डोळे वाचवण्यास मदत होत आहे.
या अभियानात परानुभूती फाउंडेशनचे नेत्र सर्जन व संस्थापक संचालक - डॉ गणेश मुंजवाल, जनरल फिजिशियन व संस्थापक संचालक - डॉ प्रवीण तळेले, मुख्य समन्वयक - राहुल समिंद्रे, नेत्र तपासणी तज्ञ - शीला समिंद्रे व करिश्मा यादव, परानुभूती फाउंडेशनचे कार्यकारी संचालक - डॉ भूषण जाधव, परानुभूती फाउंडेशनचे प्रकल्प - संचालक मंगेश राय आणि परानुभूती फाउंडेशनच्या सोशल इम्पॅक्ट एक्झिक्यूटिव्ह अशिती जोईल यांचाही यात समावेश आहे. त्याच प्रमाणे अनेक स्वयंसेवक जसे रागिनी यादव, चंदन कांबळे, पूजा सोनवणे, किरण मोहंती, कृणाली फडवळे, प्रार्थना पेंढारी, जे बी सिंग, डॉ. हरीश नागावकर, जयेश वीर यांनी मोलाचे योगदान दिले.
तसेच बर्फेश्वर तलाव गार्डन प्रमुख - शरद पाटील, ओंकार अंध अपंग संस्था प्रमुख - सुरेश पवार, रॉबिन हूड आर्मी प्रमुख - हिमांशू धांडे व इम्तियाज अली , जिल्हा परीषद शाळा वाघराळ पाडा शिक्षिका - कल्याणी मॅडम, फिनिक्स फार्म प्रमुख - मुरली नारायण यांचा कडून विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे आनंद गदगी आणि अशीति जोईल या प्रकल्पासाठी मीडिया प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत.
या प्रकल्पाची नेमकी उद्दिष्टे काय ?
परानुभूती फाउंडेशनच्या या उपक्रमांतर्गत १५ नेत्र शिबिरे आणि ३० मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यातील काही प्रमुख सेवा या पुढीलप्रमाणे आहेत:
1.

Next Story
Related News
X
