Delhi
नवी दिल्ली: दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी एका प्रचारसभेत प्रियांका गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते पवन खेडा यांनी द्विटरवर शेअर केला आहे. रमेश बिधुरी व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत, 'लालूंनी वचन दिले होते की ते बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवतील, पण ते तसे करू शकले नाहीत. मी तुम्हाला आश्वासन देतो, ज्याप्रमाणे मी ओखला आणि संगम विहारचे रस्ते बनवले त्याचप्रमाणे मो कालकाजीतील सर्व रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे करेन. या वक्तव्यावर पवन खेडा यांनी आक्षेप घेतला. त्यांनी लिहिले आहे, ही बदमाशी या नीच प्रवृत्तीच्या माणसाची फक्त मानसिकता दाखवत नाही, तर यांच्या मालकांचा खरा चेहरा दाखवते.
भाजपच्या या नीच नेत्यांमध्ये तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार दिसतील, दरम्यान, काँग्रेसच्या विरोधावर रमेश बिधुरी म्हणाले, 'मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. काँग्रेसच्या विधानावर आक्षेप असेल तर आधी लालू यादव यांना हेमा मालिनी यांची माफी मागायला सांगा, कारण त्यांनीही तसं वक्तव्य केलं होतं. रमेश बिधुरी कालकाजीमधून आतिशी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत २९ नावे आहेत. यातील ७ नेत्यांनी नुकतेच आप आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश वर्मा नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. कालकाजीमधून सीएम आतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवर काँग्रेसने अलका लांबा यांना तिकीट दिले आहे
Editorial

Editorial

Next Story