✕
बड्या दूरसंचार कंपनीला दणका; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल
By EditorialPublished on
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील रिलायन्स जिओ कंपनीच्य कार्यालयामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाच समोर आली आहे.

x

पुणे: हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील रिलायन्स जिओ कंपनीच्य कार्यालयामुळे ध्वनिप्रदूषण होत असल्याची बाच समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला नोटीस बजावली आहे. दरम्यान, कंपनीने नियमांची पूर्तता करण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये रिलायन्स जिओचे कार्यालय आहे. या कार्यालयात शीतकरण यंत्रणा म्हणजेच चिलर बसविण्यात आले आहेत. या चिलरचा आवाज मोठा असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना याचा त्रास होत होता. त्यामुळे कार्यालयाच्या शेजारील ब्ल्यू रिज सोसायटीतील नंदिनी चक्रवर्ती यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे २०२३ मध्ये तक्रार केली होली. या तक्रारीनंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्स जिओच्या कार्यालयाला भेट देऊन तपासणी केली होती. तेथील आवाजाची पातळी ७४ डेसिबल असल्याचे तपासणीत समोर आले. या प्रकरणी २६ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मुंचईतील मुख्यालयात सुनावणी झाली. ही सुनावणी दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. या सुनावणीला रिलायन्स जिओचे अधिकारीही उपस्थित होते. या सुनावणीनंतर मंडळाने जिओला नोटीस बजावली आहे. कार्यालयामुळे निर्माण होणारे ध्वनिप्रदूषण कमी करण्याबाबतचा कृती आराखडा सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश मंडळाने कंपनीला दिले आहेत. याचबरोबर आबाज कमी करणारी यंत्रणा चसविण्यासाठी ३ महिन्यांची मुदतही कंपनीला देण्यात आली आहे. याबाचत रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याने नियमांची पूर्तता दिलेल्या मुदतीत केली जाईल, असे स्पष्ट केले.

Editorial
Next Story
Related News
X
