✕
'घरोघरी तिरंगा' अभियानात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन
By EditorialPublished on
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापासून मागील दोन वर्ष देशभरात 'घरोघरी तिरंगा' (Gharo ghari Tiranga) अर्थात 'हर घर तिरंगा' अभियान उत्साहाने राबविण्यात येत असून यावर्षीही नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या काळात आपले घर, दुकान, खाजगी आस्थापना यावर स्वयंस्फुर्तीने राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

x

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापासून मागील दोन वर्ष देशभरात 'घरोघरी तिरंगा' (Gharo ghari Tiranga) अर्थात 'हर घर तिरंगा' अभियान उत्साहाने राबविण्यात येत असून यावर्षीही नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या काळात आपले घर, दुकान, खाजगी आस्थापना यावर स्वयंस्फुर्तीने राष्ट्रध्वज फडकवावा असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे 'घरोघरी तिरंगा' अभियानाचा शुभारंभ संपन्न झाला असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही आजपासून 15 ऑगस्टपर्यंत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रभक्तीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
त्यास अनुसरुन आज महापालिका मुख्यालयात अॅम्फिथिएटर येथे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्यासह उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी 'तिरंगा प्रतिज्ञा' सामुहिकरित्या ग्रहण केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, मुख्यालयाप्रमाणेच आठही विभाग कार्यालय व इतर कार्यालयांमध्ये तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
Next Story
Related News
X

