✕
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, सोमवारी औपचारिक घोषणा
By EditorialPublished on
मुंबई: विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ९ डिसेंबर या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे.

x

मुंबई: विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ९ डिसेंबर या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या दिवशी सकाळी प्रलंबित लोकप्रतिनिधींचा शपथविधी झाल्यानंतर सभागृहात महायुती बहुमत सिद्ध करेल. त्यानंतर मतदानाद्वारे अध्यक्षपदाची निवड केली जाईल. सद्यस्थिती विधानसभेत महायुतीचे २३७ आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी अधिवक्ता राहुल नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान विरोधी पक्षाकडून एकाही सदस्याने अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला नाही. त्यामुळे निवड बिनविरोध असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि त्यानंतर भाजपबरोबर जात सरकार स्थापन केले. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे भाजपनं त्यांच्याकडे घेतलं होतं. त्यावेळी भाजपनं आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. नार्वेकर हे दुस-यांदाविधानसभा अध्यक्ष होणार आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुस-यांदा विजयी झाले आहेत.

Editorial
Next Story
Related News
X
