mumbai
मुंबई : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर अद्याप शिक्कामोर्तच झालेले नसले तरी शप प्रविधी ५ डिसेंबरला होणार असून त्याचे जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. आझाद मैदानात हा शपथविधी सेहव्य पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लाडक्य बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे. तब्बल ४० हजार निमंत्रितांची जणांची उपस्थिती असेल, असे महायुतीच्य मंत्रालयीन सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महायुतीच्य मुख्यमंत्र्यांच्य शपथविधीच्या सोहळ्याचं महानियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसा जवळपास ४० हजारजणांचे उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्पितीत हा शप प्रविधी पार पडणार आहे. देशातील २२ राज्यांचे मुख्यमंत्री देखील य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लाडक्या बहिणींना यासाठी विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे. जवळपास दोन हजार व्हीव्हीआयपींच्या पासेसची यासाठी सोय करण्यात येणार आहे. आझाद मैदानात १३ विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्य बसण्याचचे व्यवस्था असणार आहे. यामध्ये तीन स्टेजची उभारणी केली जाणार आहे. एक मुख्य स्टेज आणि दोन त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे, विविध धर्माचे संत-महंत, भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांची यात उपस्पिती असेल. संत महंतांसाठी वेगळ्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे. खासदार आणि आमदारांखली देखील वेगळी आसनव्ययस्था केली जाणार आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी देखील वेगळी आसन व्यवस्था असणार आहे.
अमित शहांनी मागविले आमदारांचे रिपोर्ट कार्ड
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रीपदासाठी अटी जाहीर केल्य आहेत. या अटी पूर्ण करणाऱ्यांना मंत्रीपदे मिळणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहेत. लोकसभा निवडणुकीत संबंधित आमदाराची कामगिरी कशी होती, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संबंधित व्यक्तीने प्रामाणिकपणे काम केले का? है पाहणे चाकी आहे. मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असतील, तर महापुती सरकारच्या काळात संबंधित मंत्र्याने मंत्रालयत कशी काय सेवा केली? संबंधित व्यक्ती किती वेळ मंत्रालयात काम करत होती, महायुतीतील त्यांच्या घटक पक्षाच्या आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती? मंत्र्यांनी केंद्र आणि राज्याच्या निधीचे वाटप कसे केले? संबंधित मंत्री युती धोक्यात घालतील अशी परिस्थिती होती का? त्यांनी व्यही वादग्रस्त विधान केले होते का? या मुद्यांचे रिपोर्ट कार्ड घेऊन
अमित शहा यांनी महापुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे.
निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी महाराष्ट्रासाठी भाजपाचे निरीक्षक
भाजपाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे केंद्रीय निरीक्षक मंगळवारी राज्यात येणार असून ४ गटनेता डिसेंबरल भाजपाचा निवतला जाणार आहे.भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निरीक्षक उद्या मुंचईत दाखल होतील. याकडे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचे डोळे लागले आहेत.
मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला 'पास' नसेल तर 'नो एन्ट्री'
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'झूम' बैठकीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सविस्तर माहिती सर्वांना दिली होती. या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर ज्यांच्याकडे 'पास' असणे आवश्यक आहे, त्याबाबत पूर्व माहिती देऊन आता ज्यांच्या नावाने पास बनवला जाईल तेच भाजपचे पदाधिकारी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण भागातील पदाधिकारीही सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके, रवी राणा, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, केवलराम काळे, उमेश यावलकर, राजेश वानखडे, जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ. अनिल बोंडे, निवेदिता चौधरी, जिल्हाध्यक्षा अनिता तिखिले यांच्यासह अनेक अधिकारी ५ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमासाठी ४ डिसेंबरलाच सायंकाळी मुंबईकडे रवाना होतील.
Next Story