raj thakre
जालना, दि. ४ (वार्ताहर) : राजकीय नेत्यांकडून तुमचा वापर केला जात आहे. ते फक्त आरक्षण आणि पुतळ्याचे राजकारण करतात. त्यांच्या नादी लागू नका, असा लाखमोलाचा सल्ला मनसे (MNS) अध्यक्ष (President) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची राज ठाकरे यांनी आज (दि. ४) भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व उद्भवललेल्या परिस्थितीची माहिती करून घेतली. तसेच आंदोलनकर्त्यांना बळ देत या राजकीय नेत्यांच्या नादी न लागण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात (Marathwada) येऊ देऊ नका, असेही राज यांनी यावेळी आंदोलकांना सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. जालनामध्ये (Jalna) मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकावर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली. अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला.
यावेळी राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chif Minister) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minisrer Devendra Fadnavis) यांचे कान टोचले. ते म्हणाले की, काल (दि. ३) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्याचे राजकारण (politics) करू नका असे विधान केले आहे. त्यावर राज यांनी फडणवीस जर विरोधी पक्षात (opposition party) असते तर, काय केले असते असा उलटप्रश्न उपस्थित करत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जालन्यात येत्या ८ सप्टेंबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सराटी (Sarati) गावातील घटनेनंतर राज्य शासनाकडून हा कर्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, आता हा कार्यक्रम १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी लाठीहल्ला करण्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येण्यापासून रोखा असे आदेश आंदोलकांना दिले आहेत. त्यामुळे येत्या १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शासन आपल्या दारी (Government at your door) कार्यक्रम होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह या घटनेचे पडसाद राज्यभरात उपस्थित झाले आहे.
Editorial

Editorial

Next Story