मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी ) : मुंबईतील मुलुंडमध्ये (Mulund, Mumbai) मराठी महिलेला (Marathi woman) कार्यालयासाठी जागा नाकारल्याच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (President Raj Thackeray) यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्रात असे पुन्हा घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित,' असा इशारा त्यांनी दिला. सोबतच 'अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे,' असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले आहे.

Rajthakre
मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी ) : मुंबईतील मुलुंडमध्ये (Mulund, Mumbai) मराठी महिलेला (Marathi woman) कार्यालयासाठी जागा नाकारल्याच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (President Raj Thackeray) यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. 'महाराष्ट्रात असे पुन्हा घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित,' असा इशारा त्यांनी दिला. सोबतच 'अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे,' असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले आहे.
मुलुंडमधील एका इमारतीत तृप्ती देवरुखकर (Tripti Devrukhkar) या महिलेला मराठी असल्याने ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो तुफान व्हायरल झाला.
तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपी प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना रात्री ताब्यात घेतले.
या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात की, 'मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असे काही घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचे मनापासून अभिनंदन. तुमचे कायम लक्ष असतेच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असेच सुरु राहिले पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे! दरम्यान या सगळ्या प्रकारातील पीडित महिला तृप्ती देवरुखकर यांनी आज राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
कानाखाली जाळ ते कायद्याची मागणी, जैन- गुजराती सोसायट्यांविरुद्ध मनसेने कंबर कसली
मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस आणि भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांमुळे मुंबईत अशा जैन आणि गुजराती सहकारी गृहनिर्माण संस्था तयार झाल्या. त्यात मराठी माणसाला घर नाकारलं जात असेल तर खपवून घेणार नाही असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. तसेच मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर या सगळ्या संदर्भात कडक कायदा करा, अशी मागणी करणारे पत्र देखील मनसेने मुख्यमंत्र्यांना पाठवल्याची माहिती संदिप देशपांडे यांनी दिली. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले, जे लोक भाषेच्या, धर्माच्या, जातीच्या आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत भेदभाव करून जागा नाकारत असतील तर त्यावर कडक कारवाई व्हायला हवी. खरंतर या जैन, गुजराती सोसायटी राष्ट्रीय पक्ष काँग्रेस
(National Party Congress)
आणि भाजप (BJP) यांच्यामुळे तयार झाल्या आहेत. जेणेकरून त्यांना एकत्रित मत या सोसायटी मधून मिळतील. आता ज्याप्रकारे मराठी माणसाला तिथे जागा किंवा घर नाकारले जाते हे चुकीचे आहे. २०१६ मध्ये मुंबई महापालिकेने जे लोक भाषेच्या, धर्माच्या, जातीच्या, खाण्यापिण्याच्या बाबतीत भेदभाव करतात त्यांच्या विरोधात एक प्रस्ताव मंजूर केला होता. यामध्ये अशा ठिकाणच्या इमारतीला ओसी रद्द करण्यात यावा. आता हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर करावे. धर्म, जात, खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे अशा प्रकारचे प्रकार कुठल्या सोसायटीमध्ये घडले तर त्या ठिकाणी त्या सोसायटीचा डी रजिस्ट्रेशन करून तिथे प्रशासक नेमावा. तसेच विकासकांना सुद्धा भोगवटा प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी मनसेने केली आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये जागा नाकारल्याचा अनुभव पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) देखील आला आहे, असा दावा त्यांनी स्वतः केला आहे. एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली. त्या महिलेचा व्हिडीओ पाहिल्यावर पंकजा मुंडेंनी आपल्या भावनां वाट करून दिली. यावर संदीप देशपांडे म्हणाले. पंकजा मुंडे यांना मराठी म्हणून घर नाकारलं हे त्यांनी खूप उशिरा सांगितलं. त्यांनी त्यावेळी सांगितलं असतं तर आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत असतो. आता देखील पंकजा मुंडे यांनी स्वतःला एकटं समजू नये. पक्ष बाजूला ठेवून या सगळ्या प्रकरणात आम्ही साथ देऊ आणि त्यांना जिथे हवे तिथे घर मिळवून देऊ, असा ठाम विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.
Editorial

Editorial

Next Story