✕
ठाकरे गट आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी २५ सप्टेंबरला
By EditorialPublished on
नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) : आमदार अपात्रता ( MLA disqualification ) प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी २५ सप्टेंबर रोजी घेणार आहेत. कारण सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी एका आठवड्यात घेण्याचे आदेश दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या केसमध्ये केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्यूनल म्हणून काम करायचं आहे याची आठवण सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत करून दि

x
नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) : आमदार अपात्रता ( MLA disqualification ) प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष पुढची सुनावणी २५ सप्टेंबर रोजी घेणार आहेत. कारण सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणी एका आठवड्यात घेण्याचे आदेश दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या केसमध्ये केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्यूनल म्हणून काम करायचं आहे याची आठवण सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत करून दिली होती. त्यामुळे येत्या सोमवारच्या सुनावणीत नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेच्या (Shivsena) १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या समोर १४ सप्टेंबरसा सुनावणी पार पडली. या सुनावणीत दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजून ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना कागदपत्रांच्या देवाणघेवाणीसाठी एका आठवड्याचा वेळ दिला होता. त्यानंतर १८ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणी न्यायालयाने राहुल नार्वेकरांना सुनावलं. या प्रकरणातील सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करताय असे खडे बोल न्यायालयाने राहुल नार्वेकरांना सुनावले होते. त्यानंतर नार्वेकरांनी काल तातडीने दिल्ली गाठली आणि सल्लामसलत करून पुढची रणनीती ठरवली आणि पुढच्या सुनावणीची तारीख ठरवली आहे. आमदारांच्या अपात्रतेसंबंधित निर्देश देताना यावर पुढच्या दोन सुनावणीपूर्वी नेमकी काय कारवाई केली याची माहिती अध्यक्षांनी द्यावी. अशा पद्धतीने अनिश्चित काळ काम करू शकत नाही, किती वेळेत काम करणार याचे टाईम टेबल विधानसभा अध्यक्षांनी द्यावे असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आता त्यानंतर सोमवारी सुनावणी होताना टाईम टेबल विधानसभा अध्यक्ष देणार का हे पाहणे महत्त्वाचे असणर आहे. सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेप्रकरणी ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या कम्प्युटर जनरेडेट तारखा असल्यामुळे यामध्ये बदल होण्याची देखील शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. या सुनावणीत राहुल नार्वेकरांना आतापर्यंत केलेल्या कामाचा आराखडा द्यायचा आहे.

Editorial
Next Story
Related News
X
