Ganesh festival 2023

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी): सव्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganesh festival) लगबग पाहायला मिळत असून, अनेक मंडळांकडून बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यात येत अनेकदा आहे. दरम्यान, गणपती (Ganapati) सार्वजनिकरीत्या (Publicly) बसवला जातो. यासाठी परिसरातील किंवा सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांकडून वर्गणी जमा करण्यात येते. मात्र, सार्वजनिक उत्सव (Celebration) साजरे करण्यासाठी लोकांकडून वर्गणी गोळा करण्याआधी धर्मादाय आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून रितसर पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. अशी परवानगी न घेता वर्गणी गोळा केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी माहिती धर्मादाय सहआयुक्त यांनी दिली आहे।

औरंगाबादच्या धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५० मधील कलम ४१ क अन्वये विविध जयंती सण जसे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वगैरे याकरीता वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात येते. सध्या गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे विविध गणेश मंडळे लोकांकडून उत्सवासाठी देणगी गोळा करीत आहेत. अशी देणगी गोळा करण्यासाठी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातून परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. परवानगी न घेता देणगी गोळा करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुमच्या मंडळाकडून वर्गणी केली जाणार असेल तर अधिकृत परवानगी काढावी, असे आवाहन करण्यात आले आहे।

देणगी गोळा करण्यासाठी सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था गणेश मंडळांनी अधिनियम १९५० मधील कलम ४१ क अन्वये धर्मदाय आयुक्त कार्यालयातून परवानगी घ्यावी।

अशाप्रकारची परवानगी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने दिली जाते। ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र charity.maharashtra.gov.in संकेतस्थळावर event registration मध्ये जाऊन अर्ज दाखल करावा. अर्जासोबत दहा रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प, मंडळाचा ठराव, दोन ओळखपत्रे (आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅन कार्ड इ.), जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, पत्ता पुरावा (लाईट बिलाची झेरॉक्स प्रत), मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास मागील वर्षाचा परवानगी आदेश व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच ऑफलाईन हिशोबपत्रक इ. कागदपत्रे जोडणे अर्ज करताना आवश्यक आहे। प्रशासनाकडून ही माहिती संकेतस्थळावर अपलोड केली गेली आहे।

Updated On
Editorial

Editorial

Next Story