✕
देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा ४२ टक्के
By EditorialPublished on
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) काल संध्याकाळी पुण्यात (Pune) दाखल झाले. आज पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये (Ramakrishna More Multipurpose Hall) अमित शाह यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' (Prosperity Through Cooperation) पोर्टलचे उद्घाटन (Inauguration) करण्यात आले.
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) काल संध्याकाळी पुण्यात (Pune) दाखल झाले. आज पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये (Ramakrishna More Multipurpose Hall) अमित शाह यांच्या हस्ते 'सहकार से समृद्धी' (Prosperity Through Cooperation) पोर्टलचे उद्घाटन (Inauguration) करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल. वर्मा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी संबोधित करताना अमित शाह म्हणाले, 'गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान मोदींनी लोकांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत. ६० वर्षांपासून लोकांची जी स्वप्न होती, ती मोदींनी पूर्ण केली. आज आपण पाहिलं तर देश एका बाजूला अन् महाराष्ट्र राज्य एका बाजूला आहे. कारण, देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा ४२ टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आल्याचं शाह म्हणाले. यावेळी त्यांनी मी पहिल्यांदाच अजित पवारांसोबत एका मंचावर आहे. मोठ्या कालावधीनंतर अजितदादा तुम्ही आता योग्य जागेवर बसलात, तुम्ही आधीच या जागेवर यायला हवं होतं, असंही मिश्किलपणे म्हटलं.
पुढे अमित शाह म्हणाले की, मल्टिस्टेट को-ऑ परेटिव्ह सोसायटीच्या अॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. सहकार विभागाचे सचिव आणि त्यांच्या टीमने अत्यंत कमी वेळेमध्ये हा कायदा आमलात आणण्यासाठी कष्ट घेतले. २ तारखेला कायदा तयार झाला आणि ४ तारखेला लागू झाला. मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह अॅक्टअंतर्गत निवडणूक व्यवस्थेमध्ये सुधार, को-ऑपरेटिव्ह गव्हर्नन्स, व्यापारी सुलभता आणि स्वतंत्र निवडणूक आयोग नेमण्यात आलेला आहे. आता कुणीही आपल्या पुतण्या - भावाला नोकरीला लावू शकणार नाही. बोर्ड चालवण्याच्या नियमांत मोठे बदल केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
जो येणार तो आमचाच आहे. ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. सहकाराला गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सहकाराच्या ऑडिटची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आलीय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, त्यांच्या मार्गदर्शनात सहकाराला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्याचं काम करणार आहोत, असा विश्वास यावेळी अमित शाह यांनी बोलून दाखवला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अमित शाहांचे कौतुक
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अमित शहा यांचं आजच्या कार्यक्रमात भरभरुन कौतुक केलं. 'अमितभाई हे महाराष्ट्राचे जावई आहेत' असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तर 'अमित शहांकडून सहकार विभागात क्रांतीकारी निर्णय घेण्यात आले आहेत. त्यांनी एकदा निश्चय केला की, ते थांबत नाहीत' अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशंसा केली. तर अमित शाहांकडून सहकारात मोठे बदल झाले आहेत. अमित शाहांना महाराष्ट्र खूप चांगला कळतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Editorial
Next Story
Related News
X


